आज श्री रामदेव बाबा यात्रा महोत्सव…सकाळी ९ वाजता पालखी..

0
30
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे,

दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा श्री रामदेव बाबा भादवा मेला उत्सव आज शनिवार दि. १४ सप्टेंबर ला आयोजित करण्यात आलेला आहे या मेला उत्सवात अमरावती येथील सुप्रसिद्ध   भजन गायक मनमोहन जाजू आपल्या मधुर वाणीतून सायंकाळी ६ ते रात्री १० पर्यंत  भजन व जम्मा जागरण प्रस्तुत करतील

येथील विदर्भ विख्यात श्री रामदेव बाबा मंदिरात वर्षातून दोन वेळा मेला उत्सव साजरा केला जातो यात भादवा मेला उत्सवाला अनन्य महत्त्व असून या दिवशी रामदेव बाबांची पालखी शोभायात्रा शहरातून आयोजित करण्यात येते आज सकाळी ९ वाजता भव्य पालखी यात्रेचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे श्री रामदेव बाबा मंदिर परिसरातून संपूर्ण नगर भ्रमण करून पालखी यात्रा पुन्हा श्री रामदेव बाबा मंदिरात प्रवेशित होते यादरम्यान धामणगाव नगरीत पालखी यात्रेचे भव्यदिव्य स्वागत भक्तमंडळी करीत असते मंदिरात पूजा-अर्चना आरती होत असते

—————-

मेला उत्सवाचे आयोजन..……

मंदिर परिसर ते हुतात्मा भगतसिंग चौकापर्यंत मेला उत्सवाचे आयोजन करण्यात येते या उत्सवादरम्यान विविध प्रकारची दुकाने उपयोगी वस्तू धार्मिक पुस्तक तसेच खाण्यापिण्याचे दुकानांचे वस्तूंची स्टॉल लावण्यात येतात उत्सवामध्ये शेकडो लोकांची गर्दी तसेच भक्तांची सुद्धा मोठ्या प्रमाणात संख्या असते दर्शन व मेला उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन श्री रामदेव बाबा मंदिर ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे

veer nayak

Google Ad