आज श्री रामदेव बाबा यात्रा महोत्सव… सकाळी १० वाजता पालखी… गायक मुन्ना दुबे यांच्या द्वारे जम्मा जागरण व भजन….

0
27
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे,

दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा श्री रामदेव बाबा भादवा मेला उत्सव व पालखी यात्रेचे आयोजन आज बुधवार दि. ३ सप्टेंबर ला करण्यात आलेले आहे

 या मेला उत्सवात अमरावती येथील सुप्रसिद्ध भजन गायक मुन्ना दुबे आपल्या मधुर वाणीतून सायंकाळी ६ ते रात्री १० पर्यंत भजन व जम्मा जागरण प्रस्तुत करतील

येथील विदर्भ विख्यात श्री रामदेव बाबा मंदिरात वर्षातून दोन वेळा मेला उत्सव साजरा केला जातो यात भादवा मेला उत्सवाला अनन्य महत्त्व असून या दिवशी रामदेव बाबांची पालखी शोभायात्रा शहरातून आयोजित करण्यात येते आज सकाळी १० वाजता भव्य पालखी यात्रेचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे श्री रामदेव बाबा मंदिर परिसरातून संपूर्ण नगर भ्रमण करून पालखी यात्रा पुन्हा श्री रामदेव बाबा मंदिरात प्रवेशित होते यादरम्यान धामणगाव नगरीत पालखी यात्रेचे भव्यदिव्य स्वागत भक्तमंडळी करीत असते याप्रसंगी श्रीराम शालिग्राम ट्रस्ट च्या लक्ष्मीनारायण मंदिराची तसेच जयरामदास भागचंद येथील लक्ष्मीनारायण मंदिराची व कॉटन मार्केट येथील श्रीराम मंदिराची पालखी सुद्धा याच पालखीसोबत नगरभ्रमण करीत असते 

—————-

मेला उत्सवाचे आयोजन..…… 

मंदिर परिसर ते हुतात्मा भगतसिंग चौकापर्यंत मेला उत्सवाचे आयोजन करण्यात येते या उत्सवादरम्यान विविध प्रकारची दुकाने उपयोगी वस्तू धार्मिक पुस्तक तसेच खाण्यापिण्याचे दुकानांचे वस्तूंची स्टॉल लावण्यात येतात उत्सवामध्ये शेकडो लोकांची गर्दी तसेच भक्तांची सुद्धा मोठ्या प्रमाणात संख्या असते दर्शन व मेला उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन श्री रामदेव बाबा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विजयप्रकाश भैय्या व पंडित दूलीचंद महाराज छांगाणी यांनी व ट्रस्टींनी केले आहे

veer nayak

Google Ad