आज सकल हिंदू समाजाचा मोर्चा..बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात निषेध.

0
2
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे,

बांगलादेशातील हिंदू संतांना तेथील सरकारने अटक करून अत्याचार करण्याचे षडयंत्र मोठ्या प्रमाणात सुरू केलेले आहे बांगलादेशमध्ये सामान्य हिंदूंवर सुद्धा सातत्याने अत्याचार होत आहे.  बांगलादेश आता इस्लामी कट्टरतावादाकडे वेगाने सरकत आहे. या सर्व घटनांचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्यावतीने १० डिसेंबरला सकाळी १० वाजता वाजता धामणगाव रेल्वे येथे भव्य मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे. 

…………………………..

निषेध म्हणून व्यापाऱ्यांना प्रतिष्ठान दुपारी १२ वाजेपर्यंत बंद करण्याची विनंती….. 

उपरोक्त घटनेचा विरोध करण्याकरिता व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने दुपारी १२ वाजेपर्यंत निषेध म्हणून बंद ठेवाव्यात असे आवाहन सुद्धा सकल हिंदू समाजातील कार्यकर्त्यांनी केले आहे

…………………………..

बांगलादेशात सध्या सत्तेवर असलेले मोहम्मद गुनूस हे उच्चशिक्षित तर आहेतच पण त्यांना शांततेचे नोबेलही मिळाले आहे. हिंदूच्या कतली करण्यासाठी मोहम्मद युनुस यांना शांततेचे नोबेल

पारितोषिक मिळाले आहे का? ते सत्तेत आल्यापासून बांगलादेशात हिंदूवर सातत्याने हल्ले होत आहेत भारतात हिंदुत्ववादी सरकार आहे म्हणून हिंदू सुरक्षित आहेत. त्यामुळे बांगलादेशातील हिंदू  संतांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारने बांगलादेश सरकारवर दबाव टाकण्याची गरज आहे. याची जाणीव सरकारला करून देण्यासाठीच सकल हिंदू समाजातर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे.मोर्चात  संपूर्ण सकल हिंदू समाज सहभागी होणार आहे. 

veer nayak

Google Ad