धामणगाव रेल्वे
संत लहरी बाबा यांच्या पदस्पर्शाने ३९ वर्ष पूर्ण झालेल्या जळगाव आर्वीत विदर्भातील संताचा मेळा भरणार आहे रात्री या गावात दिवाळी साजरी करण्यात येणार आहे.
संत लहरीबाबांचा जन्म विदर्भातील अकोला जिल्ह्यातील श्रीक्षेत्र मधापुरी येथे झाला असला तरी विदर्भाच्या कानाकोपºयात फिरवून त्यांनी आध्यात्मीक विचार लोकापर्यंत पोहचविले़ सन १९३२ मध्ये शिवरामजी व आई झिबाबाई दहीकर यांच्या उदरी या अवलीया संत जन्माला आला़ त्याचे नाव भिमराव होते़ गावोगावी फिरत असतांना ते धामणगाव देव येथील संत मुंगसाजी महाराजा जवळ गेले़ महारजांनी त्यांची ओळख माझा मुगंशा अशी करून दिली़ ही माहिती मधापुरी गावात पोहचल्या नंतर त्यांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होवू लागली़ एक दिवस महाराज कुरूम रेल्वे स्थानकावरून रेल्वेत बसून कुठेतरी निघून गेले़ त्यांचा ग्रामवासीयांनी खुप शोध घेतला़ परंतू ते कोणालाही मिळाले नाही़ त्यानंतर अनेक वर्षा नंतर अमरावती येथील बजाज धर्मशाळे जवळ अचानक महाराज प्रगट झाले़ त्यांच्या आत्मनंदलहरीपणामुळे त्यांचे नाव लहरी बाबा असे पडले़
धामणगाव तालुक्याशी त्यांचा जवळचा संबध ते ३९ वर्षा पूर्वी जळगाव आर्वी येथे आलेत एका ठिकाणी गावातील मारोती मंदिरीच्या बाजुला बसून आपले अध्यात्मीक विचार ग्रामस्थाना पटवून देण्यास सुरूवात केली़ त्याकाळात गावात मोठा दुष्काळ होता़ ग्रामस्थांनी या दुष्काळाशी सामणा करण्याचे विचार त्यांनी आपल्या अमृतवाणीतून मांडले़ गावातील भाविकांचे श्रध्दास्थान झालेल्या लहरी बाबाचे छोटेसे मंदिर ग्रामस्थांनी बांधले़ तदनंतर गावातील भाविकांनी मोठे मंदिर बांधण्याचा संकल्प केला़ ज्या ठिकाणी लहरी बाबा विराजमान झाले होते़ त्यावेळी पाच फुटावर खोदून सोडलेल्या विहीरीला पाणी लागलेत तदनंतर भव्य मंदिर उभारण्यात आले़
आज या मंदिरात राजस्थान येथून आणलेली मोठी लहरी बाबांची मुर्ती विराजमान झाली आहेत़ डाव्या बाजुला पांडुरंग, दुर्गा देवी, दत्तात्रय यांची मुर्ती तर दुसºया बाजुला राम, राधा, कुष्ण, गणपती, यांची मुर्ती आहेत़लहरी बाबा यांच्या मुर्तीच्या बाजुला संत गजानन महाराज व संत साईबाबा यांच्या मुर्ती विराजमान आहेत़ प्रत्येक संताची जयंती या मंदिरात साजरी करण्यात येते़ तर एकादशीला भजन आयोजीत केल्या जाते़ हजारो भाविकांचे श्रध्दास्थांन असलेले संत लहरीबाबा यांच्या पुण्यतिथी महोत्सव दरवर्षी भाविक साजरे करतात़
मागील सात दिवसांपासून जळगाव आर्वी येथे संत लहरीबाबा पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात येत आहे़ दररोज स्नेहगंगाश्री शृंगारे आळंदीकर यांचे शिवपुरणा लाभ घेतला तर
तर रात्रीला अनेक संताचे किर्तन झाले़ उद्या सकाळी साडेसात वाजता ग्रामस्थांच्या समक्ष होम पुजेला सुरूवात होणार आहे़ तत्पुर्वी पहाटे चार वाजता ग्रामस्थ गावाची पूर्ण ग्रामस्वच्छता करणार असून संत लहरीबाबा यांच्या प्रत्यक्ष आगमानाची प्रार्थना पाच वाजता करणार आहे़ उद्या या गावात घरोघरी सकाळी व सायंकाळी दिवे लावण्यात येणार आहे़
सायंकाळी संत लहरीबाबा यांची प्रतिमा ठेवलेली रथयात्रा सात वाजता निघणार असून तालुक्यातील चाळीस भजन मंडळ या रथ यात्रेत सहभागी होणार आहे़ विशेषत: दिंडी महोत्सव गावातील प्रमुख मार्गावरून परिभ्रमन करणार असून यात संपूर्ण ग्रामस्थ सहभागी होणार आहे़