गुरुदेव म्हणून ज्यांना साऱ्या विश्वाने ओळखले त्या गुरु रवींद्रनाथ टागोर यांचा आज म्हणजेच ०७ मे हा जन्मदिवस

0
29
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

भारताचे महान साहित्यिक, कलाकार, तत्त्वज्ञ, कवी, लेखक, समाजसुधारक आणि देशभक्त आणि भारत आणि बांगलादेशच्या राष्ट्रगीताचे निर्माते म्हणूनही रवींद्रनाथांच्या कार्याकडे पाहाता येईल.

गुरुदेव म्हणून ज्यांना साऱ्या विश्वाने ओळखले त्या गुरु रवींद्रनाथ टागोर यांचा आज म्हणजेच ०७ मे हा जन्मदिवस विश्वात साजरा केला जातो. गुरुदेवांचा जन्म ०७ मे १८६१ रोजी कलकत्ता येथील ठाकूरबारी येथे झाला.

गुरुदेवांना त्यांच्या गीतांजली या काव्यकृतीसाठी १९१३ मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आलं होतं. नोबेल पारितोषिक मिळवणारे रवींद्रनाथ टागोर पहिले आशियाई व्यक्ती होते.

आज दिनांक -7 मे – गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित से.फ.ला.हायस्कूल धामणगाव- रेल्वे जिल्हा-अमरावतीचे कला शिक्षक -चित्रकार अजय जिरापुरे यांनी आपल्या विद्यालयाच्या दर्शनी फलकावर रेखाटन करून विनम्र अभिवादन केले आहे.

veer nayak

Google Ad