पवनपुत्र, हनुमंत, मारूती, बजरंगबली, रामभक्त, अंजनेय, महावीर, पवनसुत, केसरीनंदन अशा अनेक नावाने संबोधल्या जाणाऱ्या श्री हनुमानाचा जन्मोत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.चैत्र नवमीला राम नवमी साजरी केल्यानंतर सर्वत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जन्मोत्सव साजरा करण्याची धामधूम सुरू होते. चैत्र शुद्ध पौर्णिमेला पिता केसरी आणि माता अंजनी यांच्या पोटी वायुदेवाची तपश्चर्या करून मारूतीचा जन्म झाल्याने पवनपुत्र असे देखील संबोधले जाते. त्यामुळे चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती म्हणून ओळखली जाते..
- आज दिनांक -23 एप्रिल हनुमान जन्मोत्सवनिमित्ताने धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित से.फ.ला.हायस्कूल धामणगाव- रेल्वे जिल्हा-अमरावतीचे कला शिक्षक – चित्रकार अजय जिरापुरे यांनी विद्यालयाच्या दर्शनी फलकावर चित्र रेखाटन करून सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत..