१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी आमदार प्रतापदादा अडसड यांच्या हस्ते सभागृहाचे भूमिपूजन संपन्न.
देशाच्या सुरक्षेकरिता स्वतःला सर्वोतोपरी झोकून देणाऱ्या सैनिकांच्या बद्दलची कृतज्ञता म्हणून आजच्या या स्वातंत्र्यदिनी भूमिपूजन सोहळा.- आमदार प्रतापदादा अडसड
धामणगाव रेल्वे: आज भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त माजी सैनिक बांधवांकडून आयोजित कार्यक्रमाला आमदार प्रतापदादा अडसड यांनी भेट दिली व सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी सैनिकांच्या मागणी ला निदर्शनात घेवून आमदार प्रतापदादा अडसड यांच्या प्रयत्नातून सभागृह बांधकामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येने माजी सैनिक बांधव उपस्थित होते.