धामणगाव रेल्वे,
भारतीय परंपरेनुसार आणि पाश्चात्य संस्कृतीच्या पलीकडे जाऊन इंग्रजी नववर्षाचे धार्मिक पद्धतीने स्वागत करण्यासाठी आज रविवार, ५ जानेवारी रोजी भजन संध्याचे आयोजन करण्यात आले आहे. खाटू श्याम यांना विनवणी करण्याकरिता ‘पुकार बालक की’ सांवरे के बावरे या समूहाच्या वतीने सायंकाळी ७ वाजल्यापासून स्थानिक माहेश्वरी भवन,धामणगाव रेल्वे येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी श्यामरस
सुमित बावरा अमरावती यांच्यासह परविंदर पलक फतेहाबाद (उ.प्र.) व कुशल अतुल शर्मा, धामणगाव रेल्वे हे भजन सादर करतील. अमरावतीच्या लखदातार परिवारातर्फे खाटू नरेश यांच्या फुलांची शृंगार करण्यात येणार आहे झांकी व दिव्य प्रकाश दर्शन होणार आहे. भजन संध्या यशस्वी करण्यासाठी दक्ष मुंधडा पवन भंडारी, शुभम जोशी, अथर्व गुप्ता, हर्षल कांकरिया, कृष्णा केला, तनिश वर्मा, वंश मुंधडा, कौशल लोढाया, प्रतिक अग्रवाल, श्रद्धा काळे, साहिल गावंडे, विशाल गुप्ता, हर्षल शहा, डॉ. अनमोल गुप्ता, टिळक परसोने, खुशाल भट्टड, अर्णव चौबे, जीत राय, कुशल शर्मा आणि सावरे के बावरे ग्रुपचे सदस्य अथक प्रयत्न करत आहेत.