आज घुईखेड येथे उसळणार भक्तांचा जनसैलाब श्री संत बेंडोजी महाराज यात्रा महोत्सव दहिहांडी व शोभा यात्राने दूमदूमणार घुईखेड नगरी दहिहांडीनंतर यात्रा महोत्सवाला सुरूवात

0
40
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चांदूर रेल्वे : – (ता. प्र.)

संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यातील हजारो भाविकांचे श्रध्दास्थान आणि विदर्भातील एकमेव संजिवन समाधी असलेले श्री संत बेंडोजी महाराज यांनी संजिवन समाधी घेतली होती. इ.स.१३३७ पासुन बेंडोजी महाराजांच्या संजिवन समाधी सोहळा सुरू आहे. आज या सोहळ्याला ६८७ वर्ष पुर्ण झाले आहे. आता सोहळ्याला भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे. महोत्सव निमित्त आज शनिवारी (ता. १७) भव्य यात्रा भरणार असून या बेंडोजी महाराजाच्या संजिवन समाधीच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखोंचा जनसागर लोटणार आहे.

१७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता नांदगाव खंडेश्वर येथील ह.भ.प. उमेश महाराज जाधव (आळंदीकर) यांचे काल्याचे किर्तन होऊन सायंकाळी ४ वाजता गोपालकाला, दहिहांडी होईल. तसेच सायंकाळी ६ वाजता महाआरती झाल्यानंतर सायंकाळी ७ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यादरम्यान बेंडोजी महाराजांची भव्य शोभायात्रा निघणार असून यात राज्यभरातील मोठ्या संख्येने आलेल्या दिंड्या सामिल होतील. हा अद्भुत सोहळा पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी लोटणार आहे. त्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार आहे. आज शनिवारपासून यात्रा महोत्सवाला देखील प्रारंभ होणार असुन २४ फेब्रुवारीपर्यंत सदर महोत्सव चालणार आहे. याशिवाय २१ फेब्रुवारीला गोत आंबिल प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थानचे अध्यक्ष वसंतराव घुईखेडकर, विश्वस्त प्रविण घुईखेडकर, राजाभाऊ चौधरी व इतरांनी केले आहे.

१) १८ व १९ फेब्रुवारीला कुस्ती स्पर्धा व भजन स्पर्धा

श्री संत बेंडोजी बाबा संस्थान घुईखेड, मराठा क्रीडा मंडळ घुईखेड, युवा नवरंग मंडळ व नवयुवक क्रीडा मंडळ घुईखेड तथा गावकरी यांच्या संयुक्त विद्यमाने घुईखेड येथील बेंडोजी बाबा विद्यालयात आयोजित कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन १८ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता होणार आहे. त्यामध्ये चित पटची कुस्तीची स्पर्धा सुद्धा खेळवल्या जाणार आहे. तर श्री संत बेंडोजी महाराज संस्थानमध्ये श्री संत बेंडोजी महाराज गुरुदेव सेवा मंडळ व श्री संत बेंडोजी महाराज संस्थान घुईखेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य विदर्भस्तरीय खंजरी भजन स्पर्धेचे उद्घाटन १८ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता होणार आहे. ही स्पर्धा प्रौढ गट तसेच महिला आणि बाल गट या दोन गटात होणार आहे. दोन्ही स्पर्धा दोन दिवसीय राहणार आहे.

२)सन १३३७ चा ऐतिहासिक बिल्ला

संत बेंडोजी महाराजांच्या इतिहास प्राचीन असून संस्थानने सन १३३७ साली तयार केलेला भालदार व चोपदारांचा बिल्ला आजही विश्वस्तां जवळ असून तो प्राचीन इतिहासाची साक्ष देत आहे.

३) तेराव्या शतकातील संत बेंडोजी महाराज

बेंडोजी महाराजाच्या जन्माची नोंद नाही. मात्र तेराव्या शतकात घुईखेडच्या जंगलात आठ वर्षाचा मुलगा मेंढपाळांना मिळाला. त्यांनी त्याला घरी आणले. पाठीवरील दोन बेंडामुळे लोेक त्याला बेंडोजी म्हणून लागले. खोलाड नदीच्या तिरावर, जंगलात गुरे बेंडोजी चारत असे. एकदा या वनातुन बुध्दीपुरी महाराज जात असतांना बेंडोजींचा अधिकारी म्हणून त्यांच्या शिरावर वरदहस्त ठेवला. गुरूच्या कृपाप्रसादाने बेंडोंजींना ४ दिवस अखंड समाधी लागून गुरूचा अनुग्रह प्राप्त झाला. बुध्दपुरी महाराजांनी त्यांना नाथ संप्रदायाच्या परंपरेत आनले. यानंतर बेंडोजीबाबा अंतर्मुख राहू लागले. सच्चीदानंद बाबाचे कार्य अपुरे व ते जिवंत असल्याचे सांगून सिध्द केले. संतत्वाने लोकसंग्रह वाढू नये यासाठी ते दुर गुरांसोबत वनात राहत. अशातच नागपूर-पुणे महामार्गावर तळेगाव दशासरचे रामजी सोनार विश्वासाने सोनाराचा व्यवसाय करतांना पाच तोळ्याचे चांदीचे कडे खोटे दिल्याचा आळ आला.त्यांना तुरूंगवास झाला.त्यामूळे त्यांचे मन विरक्त झाले. तुरूंगवास नंतर ते कुठेही फिरू लागले. अशातच त्यांनी रानात बेंडोजींना पाहिले. ते त्यांच्या मागे राहू लागले. महाराजांनी त्यांना परत जाण्यास सांगीतले, मात्र रामजी गेले नाही. याला ४ महिण्याचा काळ लोटल्यामूळे बेंडोजी व्यथीत झाले. परंतु रामजीची तळमळीमूळे महाराजांनी त्यांना अनुग्रहीत केले. रामजी सोनार हे त्यांचे पहिले व शेवटचे शिष्य.’जगाच्या कल्पना संतांची विभुती’ या वचनानुसार स्वतःच्या तप सामथ्र्यांने त्यांनी अनेकांचे जीवन कृतार्थ केले .रामजीसह इतर भक्तांना सांगुन त्यांनी समाधी घेतली. संत ज्ञानेश्वर नंतर संजिवन समाधी बेंडोजी महाराजांनी घेतली. १३ व्या शतकात माऊलीनी समाधी घेतली तर तेथून ३७ वर्षांनी बेंडोजीबाबांनी समाधी घेतली. त्याची ऐतिहासीक साक्ष बिल्ले असून बेंडोजीबाबाच्या कृपेने अनेकांचे कल्याण झाले. देहू येथे संत तुकाराम महाराज मंदिरात आजही रोज बेंडोजी महाराजांची काकड आरती गायली जाते.

veer nayak

Google Ad