धामणगाव रेल्वे
तालुका काँग्रेस कमिटी, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरीदी विक्री धामणगाव रेल्वे, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, व मित्र परिवाराच्या संयुक्त विद्यमानाने माननीय माजी आमदार शेतकऱ्यांचे नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष वीरेंद्रजी जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त सामान्य रुग्णालय येथे फळ वाटपाचा कार्यक्रम सकाळी घेण्यात आला तसेच मागील 30 वर्षापासून वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रमाचे विविध कार्यक्रम आयोजित केल्या जात असते त्यामध्ये ग्रामीण भागातील वृद्ध लोकांचे मोत्या बिंदू याची तपासणी करून त्यांचे ऑपरेशन करून घेणे त्यांना चष्मे वाटप करणे औषध वाटप करणे हा उपक्रम दरवर्षी प्रमाणे होत असतो.
यावर्षी ५१ रुग्णांना मोतीबिंदूचे ऑपरेशन करून त्यांना चष्मे वाटप करण्यात आले १ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट पर्यंत रुग्णाची तपासणी करणे ब्लड शुगर विविध तपासण्या करून पेशंटला दवाखान्यात नेणे व त्यांना सुखरूप घरी आणणे हे सर्व काळजी काँग्रेस कमिटी , युवक काँग्रेस व तसेच सर्व डॉक्टरची चमू करत असतात त्यामध्ये डॉक्टर काळे मॅडम राजू जगताप यांची चमू हे सर्व ऑपरेशन चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी मदत करत असतात यामध्ये सर्व गावातील अशा वर्कर यांनी सर्व पेशंटला भेटून त्यांना दवाखान्यापर्यंत आणणे ही जबाबदारी सुद्धा आशा वर्कर यांनी पार पाडली आज सर्व आशा वर्करचा सत्कार जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्ष मा उत्तराताई जगताप यांच्या यांच्याकडून सन्मान करण्यात आला यावेळेस मंचावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सविताताई गावंडे, खरेदी विक्रीचे अध्यक्ष बबनराव मांडवणे, जिल्हा परिषद चे माजी सभापती सुरेश निमकर, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष पंकज वानखडे ,जिल्हा बँकेचे संचालक श्रीकांतजी गावंडे, शहर काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष चंदू डहाणे, सेवा दलाचे अध्यक्ष नंदकुमारजी मानकर ,अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष अजय तूपसुदरे, महिला काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिता मेश्राम, शहर महिला काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष शेळके मॅडम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संगीता गाडे , युवा काँग्रेसचे अध्यक्ष आशिष शिंदे, नितीन दगडकर, नितीन कनोजिया , यशवंत बोरकर,शर्मा ताई, रॉय ताई, रवी भुतळा, मुकुंद माहोरे ,सुनील भोगे, संतोष पडसापुरे, अविनाश इंगळे, सुधीर शेळके, संजय शेंडे, डॉ प्रमोद रोंघे ,अवधूत दिवे, मनोज वेरुळकर, हेमंत कडू ,मुकेश राठी, सावरकर काका, शुभम भोंगे ,निवृत्ती वैद्य ,बबलू भेंडे, नितीन देशमुख ,मगन नगराची ,शैलेश निस्ताने ,जितू चौधरी, अविनाश मांडवगणे, सचिन समोसे, भाऊराव मबमनोटे, दिनकरराव जगताप,मीनाक्षी ठाकरे , विपिन ठाकरे, मंगेश बोबडे, मयूर डुबे, वैभव पावडे ,उमेश झीबळ ,राहुल ठाकरे ,संजय निमकर ,डॉ शिंदे, संजय गाडे, गजानन घोंगडे, प्रशांत सबाने, राजेंद्र रोकडे, उमेश शिसोदे,राजाभाऊ भोगे, राजूभाऊ गंगन , प्रकाश राठी, बंटी भोंगे, सलीम पठाण, अतुल इंगोले, आशिष भोगे,असंख्य कार्यकर्ते आशा वर्कर व मित्रपरिवार उपस्थित होता कार्यक्रमाचे संचालन तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पंकज वानखडे यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन चंदू डहाणे यांनी केले