आज १जुलै, आदरणीय भाऊंचा वाढदिवस भाऊ आपणांस वाढदिवसाच्या शुभेच्छा..

0
0
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

जेष्ठ नेते भा.ज.पा. मा.श्री.अरूणभाऊ अडसड आपणांस वाढदिवसाच्या शुभेच्छा..

पाण्यालाही पेटवणारा वक्ता,चैतन्याची सळसळती मशाल,प्रगल्भ विचार दिलदार मन रोखठोक भूमिका,प्रशुब्ध मनाची निशब्द हूंकार म्हणजे आदरणीय भाऊ विदर्भाची मुलख मैदानी तोफ, विकासाचा महामेरू,विदर्भाचा बुलंद आवाज, कार्यकर्त्यांना कार्यकर्ता नव्हे तर स्वतःच्या लेकराखेरीज सदैव पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे व्यक्तीमत्व म्हणजे आदरणीय अरूणभाऊ अडसड..

जेष्ठ नेते भारतीय जनता पक्ष आदरणीय अरूणभाऊ अडसड विदर्भाचा बुलंद आवाज म्हणून ख्याती प्राप्त ही ख्याती नव्हे तर तमाम कार्यत्यांनी भाऊंना घातलेली प्रेमळ साद आहे. ज्या व्यक्तीमत्वाने कित्येकांना घडवल कित्येकांना तारल कित्येकांची भवितव्ये घडवली कारण सदैव मनी एकच विचार कार्यकर्ता हा कार्यकर्ता नसून आपल्याच कुटूंबातील सदस्य आहे अशी ज्यांची वागणूक, सर्वांस पोटास लावणे आहे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रल्गभ विचाराचा हाच वारसा अंगी तेवत समाजात प्रत्येक घटकांत वावरतांना भाऊंची हि भूमिका आपणांस बघावयास मिळते. “फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश..” बस याच काळ्या किभ्भीन्न अंधारात प्रकाशाचा एक ओघ एक प्रकाशाचा किरण स्वतःच बुलंद अस व्यक्तीमत्व निर्माण करणारा माणूस म्हणजे भाऊ, साध आणि सरळ म्हणायचं झाल्यास दिवाणखान्यात लोक निरोपयोगी मनी प्लॅन्ट ला पाणी घालतात पण त्याच घराच्या त्याच दिवाणखान्याच्या गॕलरी मध्ये संबंध ताकतिनीशी चारही खाने चित करीत त्या सिमेंटच्या भिंतीला जणू भूकंपाचा हादरा बसावा त्याप्रमाणे सिमेंट फोडून “पिंपळाप्रमाणे” स्वबळावर स्वतःच एक आगळ वेगळ अस्तित्व निर्माण करत वरती येतो. ज्याला खत पाणी कोणीही घातलेल नसत तरी तो प्रस्थापित भिंती फोडून जगाला दाखवतो आपल स्वतंत्र अस्तित्व. आता चंदेरी दूनियेचा काळ आहे. ज्यांना देश सुद्धा त्यावेळी स्विकारायला तयार नव्हता. आता असे कितीतरी लोक सांगतील दूनियेला वेड लावणारे, आता चालतीचा काळ आहे तो पडतीचा काळ होता आणि त्याकाळात विदर्भात ज्याच अस्तित्व नव्हतं ज्याच नावलौकिक विदर्भात उदयास नव्हतं त्याकाळात धामणगाव तालुक्यातच नव्हे तर संबंध विदर्भ आपल्या वाणीने,तेजोमय वृत्तीने,अथक संघर्षातून भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व स्विकारत एक अशी कार्यकर्त्यांची माळ त्यांनी गुंफली की ती तुटता तुटेना अखेर खरा विदर्भाचा बुलंद आवाज उदयास आला त्या काळी भाऊंनी धुरा सांभाळत पक्षाला ज्या उच्चांकावर नेऊन ठेवले की जिथून आता परतीची तमा नाही मी स्पष्ट व माझ्या शब्दांत भाऊंच वर्णन म्हणजे भारदस्त व्यक्तीमत्व,अत्यंत महत्वकांशी,धुरंधर राजकारणी,प्रभावी नेतृत्व आणि वकृत्वाने जनसमुदायाला आपलस करणारे व्यक्तीमत्व आमचे प्रितृतुल्य अरूणभाऊ अडसड प्रत्येक विजयात संघर्ष अन संघर्षात विजय म्हणजे भाऊ, प्रवाहाच्या विरूद्ध दिशेने पोहण्याच धाडस करून प्रवाह बदल्याणी अफाट ताकत म्हणजे भाऊ, आपल्या कार्यकर्त्यांना भरल्या अंतकरणांने सांगतात की आता रडायच नाही तर लढायच हा प्रबळ विश्वास आत्मविश्वास म्हणजे भाऊ, कार्यकर्त्यांना पाठीवर शाबासकीची थाप मारली की त्याला देवरूपी आशीर्वादाचा भास म्हणजे भाऊ, दुर्भाग्याच रूपांतर भाग्यात करणारा परिवर्तनवादी विचार म्हणजे भाऊ, कधी अडवाणी कधी अटलजी तर कधी मोदीजींच्या खांद्यास खांदा लावून लढणारा माणूस म्हणजे भाऊ, बहिरमच्या याञेत शेतकऱ्यांनसाठी गोळ्या झेलणारा माणूस म्हणजे भाऊ, शिमला कराराच्या वेळेस तुरूंगवास भोगणारा माणूस म्हणजे भाऊ, साधू संताच्या चरणी नतमस्तक होणारा माणूस म्हणजे भाऊ, सरतेशेवटी कधी काळ्या पैशाच्या अभावी तर कधी स्वतःच मोठ्या केलेल्या आपल्याच माणसांच्या फितुरीपणानी हरणारा माणूस म्हणजे भाऊ, ज्याची किर्ती आणि यशोगाथा आज मला लिहताना कुठे आनंद तर अश्रू अनावर होतात तर शब्द अपूरे पडतात असे हे अफाट व्यक्तीमत्व म्हणजे भाऊ आदरणीय अरूणभाऊ..

भाऊ आपणांस जुना धामणगाव देशमुख परिवाराकडून वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दीक हार्दीक शुभेच्छा…

वैभव मीनाक्षी सुभाषराव देशमुख            मो.क्र.-९६६५७९६१२४                                                    जुना धामणगाव                                                ता.धामणगाव रेल्वे                                            जि.अमरावती

हजारो कार्यकर्त्यांनपैकी लाखो चाहत्यांनपैकी एक अरूणभाऊ अडसड यांचा कार्यकर्ता.

veer nayak

Google Ad