शिरजगाव कोरडे. ता.चांदुर रेल्वे जि.अमरावती येथे समितीची बैठक घेण्यात आली असून त्या बैठकीमध्ये संस्थापक अध्यक्ष सौ.जया दिलीपराव बद्रे, सहसचिव सौ.निता संजय तिवारी,महाराष्ट्र पोलीस बॉइज विदर्भ सचिव भाग्यश्री चव्हाण,
जिल्हाप्रमुख शुभम भटकर, धामणगाव येथील पत्रकार राजू गायकवाड,शिरजगाव कोरडे येथील उपसरपंच सौ.संगीता वासुदेवराव बद्रे व त्यांच्या सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
शिरजगाव कोरडे येथे महिला व बालकल्याण सुरक्षा समिती अमरावतीच्या वतीने बैठक घेण्यात आली शिरजगाव कोरडे गावातील या लोकांनी दारु विक्री सुरू केली असून त्याकरिता आमच्याकडे समस्या घेऊन या महीला आल्या असून त्या महिलानी आमच्या गावामध्ये अवैध दारू विक्री थांबावी असे बरेच प्रश्न मांडले त्यावर आम्ही सर्व महिलांनी जिल्हाधिकारी माननीय पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले पोलीस स्टेशनला सुद्धा निवेदन दिले आता त्यावर थोडीफार कारवाई करण्यात आली असून आम्ही सर्व महिलांनी या गावांमध्ये एक संघटन तयार करू आणि त्यावर बरीच चर्चा करण्यात आली चर्चा अशी महिला सक्षमीकरण,बाल हक्काचे संरक्षण, समाजातील अन्याय अत्याचारांना प्रतिबंध करण्यासाठी,तसेच शासकीय योजना व उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी व महिलांकरिता कॉन्सिलिंग सेंटर चालवण्याबद्दल याबाबत ची माहिती दिली असुन बैठकीत महिलांच्या तक्रारींचे निवारण घरगुती हिंसा प्रतिबंध, बालमजुरी,बालविवाह, रोखण्यासाठी महिलांना रोजगार मिळवून देणे संघटनेचे उद्देश कार्यपद्धतीने व सामाजिक कार्य यावर मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच शिरजगाव कोरडे गावातील सर्व महिलांनी आमचा महिला व बालकल्याण सुरक्षा समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा करून आम्हाला आनंदाने ऐकून घेतल्याबद्दल त्यांचे महिला व बालकल्याण सुरक्षा समितीची संपूर्ण टीम आभार आहे नारीशक्तींचा विजय असो