भोई समाजाच्या आरक्षण व विविध मागण्यांसाठी चांदुर रेल्वे येथे ५ सप्टेंबर रोजी उपविभागीय कार्यालयावर धडक मोर्चा नेण्यात आला,हा मोर्चा समाजातील युवा नेतृत्व सुरज मेश्राम यांच्या नेतृत्वात निघाला,या मोर्च्यात अंदाजे सात ते आठ हजार भोई समाजातील लोकांनी मोठ्या संख्येत सहभाग घेतला होता,मुख्यत: महिला युवावर्ग,विद्यार्थी व वृद्धांची,पुरुषांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. जय भोईराजच्या घोषणा पूर्ण चांदूर रेल्वे शहरात घुमत होत्या.
भोई समाजाला अनुसूचित जमातिं प्रवर्गातुन आरक्षण देण्यात यावे कारण ईतर राज्यांत भोई समाजाला अनुसूचित जमातिं चे आरक्षण असुन भोई समाज हा भटकंती करुन आदिवासींच्या तेचं जगणारा आहे,भोई समाजाला विभागातील सर्वांत मोठी मच्छीची बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात यावी,एन.डी.आर.एफ मध्ये भोई समाजातील लोकांना ७०%टक्के नौकरीत आरक्षण देण्यात यावे,समाजाला वेगळ्या विशेष प्रवर्गातून घरकुल मंजूर करण्यात यावे,गावोगावी भोई समाज मंदिर बांधून देण्यात यावे,शिक्षणात समाजातील विद्यार्थ्यांना संपूर्ण फी माफी किंवा सवलत देण्यात यावी,धरणाचा मासेमारीचा कंत्राट भोई समाजालाच मिळण्यात यावा, यासारख्या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.या मोर्चात हजारोंच्या संख्येत भोई समाजातील लोकांचा सहभाग असूनही अतिशय शिस्तबद्ध व शांततेत हा मोर्चा यशस्वी झाला.मुख्यतः कोणत्याही राजकीय पक्षाचा सहभाग या मोर्चात नव्हता तरीही आम्ही साधारण भोई जातीचे व्यक्ती म्हणून समाजात एकरूप होऊन यात सहभागी झालो,असे भोई समाजातील लोकांचे प्रामाणिक मत होते.
आमचा भोई समाज हा अतिशय दयनीय परिस्थीत असून समाज अधोगतीला चालला आहे,समाजाच्या उद्धारासाठी आम्हाला आरक्षण आणि आमच्या मागण्या त्वरित पूर्ण करण्यात याव्यात नाहीतर पुढची वाटचाल वरील कार्यालयात करू आणि भोई समाज आता जागा झाला आहे,समाजात आता क्रांती घडून येत आहे.भोई समाजाच्या मागण्या शासनाने कराव्या असे प्रतिपादन भोई समाजाचे युवा नेतृत्व सुरज मेश्राम यांनी केले.