चांदुर रेल्वे- (ता. प्र.)
तालुक्यातील घुईखेड येथील श्री.संत बेंडोजी महाराजांची संजिवनी समाधी संपूर्ण महाराष्ट्रात प्रख्यात असून हा संजिवनी समाधी महोत्सव घुईखेड येथे पार पडला. रविवारी २१ फेब्रुवारीला गोतांबील महाप्रसादाचा भव्य कार्यक्रम संपन्न होऊन यामध्ये ३० हजाराच्यावरून भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
चांदुर रेल्वे वरून २० कि.मी. अंतरावर असलेल्या घुईखेड येथे श्री. संत बेंडोजी महाराज संजिवनी समाधी महोत्सव ११ फेब्रुवारीपासुन सुरू होऊन १७ फेब्रुवारीला भव्य शोभायात्रा, दहिडांडी पार पडली. तसेच १८ व १९ फेब्रुवारी विदर्भस्तरीय खंजिरी भजन स्पर्धा व राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.तर बुधवार २१ फेब्रुवारीला भव्य गोतांबील महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये घुईखेड येथील गावकरी, यात्रेकरू, संपूर्ण यात्रेतील दुकानदार, मांजरखेड, दानापुर, जावरा, बग्गी, टिटवा, एकलारा, खरबी, येरड, निमगव्हान, जवळा धोत्रा, सातेफळ सह संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यातुन भाविक भक्त या गोतांबिल महाप्रसादाच्या कार्यक्रमाला हजर होते. रविवारी दुपारी १२ वाजता पासून या भव्यदिव्य कार्यक्रमाची सुरुवात होऊन सायंकाळी ८ वाजतापर्यंत हा कार्यक्रम चालतो. यामध्ये ३० हजाराच्यावरून भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.
या महाप्रसादाच्या यशस्वितेकरिता श्री. संत बेंडोजी महाराज संस्थानचे अध्यक्ष वसंतराव घुईखेडकर, प्रवीण घुईखेडकर, विजय घुईखेडकर, राजु चौधरी, ईश्वर मेहर, रमेश सहारे, राजु कुपरकार, महेश महल्ले, कुणाल सिंगलवार, रूपेश भोयर, प्रविण मेश्राम, नकुल तिवाडे, मारोतराव मेश्राम, संगम तायडे, दादाराव क्षिरसागर, अंकुश पांडे, स्वप्निल पांडे, पिंटु कोपरकार, दादाराव कुडे, महादेवराव सोनोने, राजु मेश्राम, अनिल चनेकार, अंबादास निम्रट, बालु गायकवाड, किशोर क्षिरसागर,यंशवत काकडे यांच्यासह गावकऱ्यांनी अथक परीश्रम घेतात.