दाभाडा येथे महादेव बाबा जयंती महोत्सवात हजारो भाविकांनी घेतला महाप्रसाद..

0
91
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे

धामणगाव रेल्वे तालुक्यातील दाभाडा या संतनगरीमध्ये महादेव बाबा जयंती उत्सवात हजारो भाविकांनी घेतला महाप्रसाद.
दाभाडा येथे सर्व समान महोत्सव म्हणजे परमहंस महादेव बाबा यांची जयंती मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरी केल्या जाते त्यानिमित्ताने सात दिवसीय विविध कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी करण्यात येते.

या महोत्सवामध्ये अनेक संत मालिका या विचारावर मार्गदर्शन करण्यासाठी अनेक मान्यवरांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात येते त्याचप्रमाणे नाचू कीर्तनाच्या रंगी अशा पद्धतीचे कीर्तन सुद्धा रोज आयोजित केल्या जात होते.
सकाळी पहाटेच्या वेळी ला रामधून सामुदायिक ध्यान सामुदायिक प्रार्थना या विषयावर तसेच अनेक विविध कार्यक्रम या महोत्सवा अंतर्गत आयोजित केले गेले होते.

महादेव बाबांच्या जयंती महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सकाळी राम धूर काढण्यात आली त्यानंतर संपूर्ण गावांमधून या परिसरातील विविध पालख्यांनी सहभाग घेतला होता त्याचबरोबर या धामणगाव रेल्वे तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामधून या ठिकाणी पालकांचे आगमन झाले महिला मंडळ भजन मंडळ अनेक गुरुदेव सेवा मंडळे यामध्ये सहभागी झाले होते.

त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी गोपाल काल्याचे किर्तन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.संपूर्ण तालुक्यातील या ग्रामीण भागातील नागरिक नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला हजेरी लावण्यात येते यामध्ये हजारो भाविक सहभागी झाले होते. या महोत्सवा अंतर्गत अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते त्या कार्यक्रमाच्या सहभागी होण्यासाठी बाहेरगावी दिलेल्या मुली आपल्या माहेरवाशीनेचा एक कार्यक्रम म्हणून या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात हजर असतात हे मात्र इथले विशेष आहे .
दुपारच्या वेळेला अनेक भाविकांनी मोठ्या प्रमाणात याचा वाला आस्वाद घेतला व हजारो भावी या यात्रेमध्ये या महोत्सवामध्ये सहभागी झाले होते.

veer nayak

Google Ad