माऊली दास धामणगाव रेल्वे….. कर्मयोगी श्री संत गाडगे महाराज यांची 150 वी जयंती निमित्ताने धामणगाव तालुक्यातील वाठोडा ग्रामामध्ये समाज प्रबोधन कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. श्री संत गाडगे महाराज यांची हुबेहूब वेशभूषा घेऊन धामणगाव तालुक्यातील गाडगे महाराज म्हणून परिचित असलेले ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे ,माऊली दास यांच्या कीर्तनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संत गाडगे महाराज यांनी समाजाला स्वच्छतेचा संदेश दिला सोबतच मानवतेचा संदेश दिला .संत गाडगे महाराजांच्या वेशभूषेतून संत गाडगेबाबांचे संपूर्ण जीवन चरित्र यावर विशेष भर देऊन पशु हत्या ,व्यसनमुक्ती ,शिक्षण, अंधश्रद्धा , स्वच्छता, मंदिरे, शाळा,यावर प्रकाश टाकण्यात आला .देव दगडात नाही तर तो माणसात आहे त्याची पूजा करा. असे गाडगे महाराज आपल्या कीर्तनातून सांगायचं नवसे कन्या पुत्र होती मग का करणे लागे पती नवसानि लेकर होत नाही बाबा म्हणून समाजातली अंधश्रद्धा दूर झाली पाहिजे यासाठी समाजावर कडाडून विरोध करणारे श्री संत गाडगे महाराज यांच्या वेशभूषेतून माऊली दास यांनी कीर्तनातून म्हणाले की खरा देव हा माणसात आहे त्याची सेवा करा .आपल्या मायबापांची सेवा करा त्यातच देव आहे. गोरगरिबांची सेवा करा त्यातच देव आहे .गावामध्ये सेवा करून गाव रामराज्य निर्माण करा असे प्रतिपादन ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे यांनी केले .माणसात देव शोधणारे कर्मयोगी संत गाडगे महाराज होय . गाडगे महाराज एकही वर्ग न शिकलेला माणूस परंतु आज त्यांच्या नावाने अमरावती विद्यापीठ आहे. अंगावर चिंध्या पांघरून समाजाला प्रबोधन करून या अमरावती जिल्ह्याचे नावलौकिक करणारे महान संत म्हणजे डेबूजी झिंग्राजी जानोरकर होय.असे ते म्हणाले आपल्या कीर्तनाच्या शैलीतून त्यांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची भूमिका सादर करून ग्रामगीता ही गावाला कशी महत्त्वाची आहे यावर बोलत असताना आज समाजाला सु संस्काराची आवश्यकता आहे सोबतच आजच्या माय बापाला सुद्धा संस्काराची आवश्यकता आहे. मोबाईल मुळे आजची युवा पिढी बिघडत चाललेली आहे. म्हणून सर्वत्र आपल्याला दिसते बलात्कार याचे प्रमाण वाढत दिसत आहे .यासाठी आपण आपल्या मुलांना सुसंस्कार शिबिरात पाठविले पाहिजे त्यांना संतांचे विचार दिले पाहिजे असे प्रतिपादन ग्रामगीता चार्य हनुमंत ठाकरे यांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून समाजाला प्रबोधन केले .

संत गाडगे महाराज यांचे दशसूत्री आपल्या कीर्तनातून समजावून सांगून समाजाला संदेश दिला की आपणही गाडगे महाराजांनी दिलेल्या दशसूत्री चा अवलंब करून आपल्या जीवनात महान कार्य करूया या कीर्तनाला साथ सांगत म्हणून शुभम जुनघरे चेतन बोरकर ,किशोर सावंत यांनी सात संघत दिली वाठोडा गावातील संपूर्ण गावकरी कीर्तनाला मोठ्या संख्येने उपस्थित होते .गेले सांगून गाडगेबाबा या गीताने कार्यक्रमाची सांगता करून जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले तोचि साधू ओळखावा देवतेची जाणावा या भैरवीने कार्यक्रमाचा शेवट झाला .सर्वात शेवटी राष्ट्रवंदना घेऊन कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली.















