चांदुर रेल्वे / नगरपरिषद कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना बसण्या करिता साध्या खुर्ची नसून त्यांना आपले काम होई पर्यंत तात्काळात उभे राहावे लागते,तर कर्मचारी मात्र गद्दार गद्ददेदार खुर्च्यावर बसून कामे करताना दिसून येते,नगरपरिषद कार्यालयात चक्री व्याजदर कर भरणाऱ्या करदाता करिता खुर्च्या चे बजेट नसल्याचे दिसून येते
नगरपरिषद कार्यालयात अनेक विभाग आहे त्यामधील कर विभाग,मुख्य अधिकारी यांची केबिन वगळता इतर कोणत्याही विभागात आपल्या अडीअडचणी सांगण्या करिता येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना बसण्याकरिता साध्या खुर्च्या ही नाही,या कार्यालयातील सार्वजनिक बांधकाम विभागात शहरातील नागरिकांना घराच्या किंवा मार्केटच्या परवानगी करिता यावे लागते हेच नागरिक अशा परवानगी करिता लाखो रुपये नगरपरिषद मध्ये भरतात, तरीसुद्धा या विभागात येणाऱ्या नागरिकां करिता बसण्याची सुद्धा व्यवस्था नाही, नागरिकांनी बसण्याकरिता खुर्ची मागितल्यास इथे खुर्च्या नसल्याचे सांगण्यात येते,या व्यतिरिक्त स्वच्छता विभाग, पाणीपुरवठा विभाग अकाउंट विभाग तसेच इतर कोणत्या विभागात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना बसण्याकरिता खुर्च्या दिसून येत नाही,तर नागरिकांना आपले म्हणणे तसेच काम होईपर्यंत खुर्चीवर बसलेल्या साहेबांकडे तत्काळत उभे राहावे लागते, सर्व सर्वसामान्य नागरिकांची अशी भीषण परिस्थिती या कार्यालयात निर्माण झाली आहे कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बसण्याकरिता गद्यदार खुर्च्या असून उन्हाळ्यात कर्मचाऱ्या करिता कुलर एसी लावले जातात मात्र सर्वसामान्य नागरिकांची नगरपरिषद कार्यालयाला गया वया पहावयास मिळत आहे,














