धामणगाव रेल्वे मतदारसंघाची यंदाची निवडणूक तालुक्यातच नव्हे तर अमरावती जिल्ह्यात चर्चेला होती, कारण सुद्धा तसंच होते, ते म्हणजे “विकास”. पाच वर्ष मतदारसंघाचा केलेला विकासात्मक दृष्ट्या कायापालट यावरती ही निवडणूक होती. अर्थातच या विकासाचे दुसरे नाव म्हणजे आपला प्रतापदादा, या नावामुळे कधी नव्हे ते हा मतदारसंघ इतका चर्चेत आला ही केवळ सुरुवात होती प्रतापपर्वाची. आपला प्रतापदादा आता परत आमदार झाला. हवा तसा नवा बदल परत बंधू आणि सुजाण भगिनींनी करून घेतला. विधानसभेला उमेदवारी मिळवण्याची आणि आमदारही होण्याची प्रतापदादाची ही दुसरी वेळ. यापूर्वी ते धामणगाव रेल्वे नगरपरिषदेचे नगराध्यक्ष व सोबतच पक्षाने महाराष्ट्र प्रदेश भाजयुमो उपाध्यक्ष पदाची ही जिम्मेदारी अतिशय काटेकोरपणे सांभाळत होते. आणि २०१९ ला ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. हा प्रवास सुरू असताना दादा या ठिकाणी इतक्यातच थांबले नाही. त्यांनी वडील भाजपा नेते आदरणीय अरुणभाऊ अडसड यांच्या मार्गदर्शाखाली व बहीण आक्का अर्चनाताई अडसड रोठे यांच्यासोबत शेतकरी, कष्टकरी आणि महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी हिरीरीने पुढाकार घेतला. प्रतापदादांनी योग्य व्यासपीठाच्या माध्यमातून तरुणाईतील कलागुणांना प्रोत्साहन दिलं, मतदारसंघातील शहरी व ग्रामीण भागातील युवकांन करिता रस्सीखेच स्पर्धा, कबड्डी स्पर्धा अगदी महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून भजन स्पर्धा नेहमीच आयोजित करतात. सोबत आरोग्य शिबीर महिलांसाठी मेळावे,बचत गट अशी उपक्रम नियमितपणे सुरूच असतात. याच समाजकारणाला राजकारणाची जोड देऊन अधिक चांगलं काम करण्यासाठी प्रताप दादांना २०२४ च्या निवडणुकीच्या रिंगणात धामणगाव रेल्वे मतदार संघाच्या मायबाप जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला. धामणगाव रेल्वे मतदार संघाचे आमदार म्हणून करत असलेल्या कामाचा अनुभव गाठीशी होताच तरीही गेल्या निवडणूकीतील काही घडामोडी पाहिल्या तर विधानसभेची ही निवडणूक प्रताप दादांना तितकी सोपी होती पण, नव्हती पण. विकासाभिमुख राजकारण करतांना विरोधकाकडून अपप्रचार, धनशक्ती त्यात तब्बल १५ वर्षे निवडून आलेल्या विरोधकाचा अनुभव अश्या परिस्थितीत प्रताप दादांनी ही निवडणूक जिंकली. धामणगाव रेल्वे मतदारसंघाची ओळख होती ती रखात पडलेला विकासाचा मतदारसंघ म्हणून त्यात तो पुन्हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणवल्या जायचा अशाच सर्वार्थानं प्रतिकूल परिस्थितीतही प्रतापदादा या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्धार केला होता. त्यानंतरचा सर्व प्रवास तर अख्ख्या धामणगाव रेल्वे मतदार संघाला दिसला. प्रताप दादांनी मतदारसंघातच तळ ठोकला सकाळी सहाला सुरू झालेला त्याचा दिवस संपायचा तो रात्री दोन ला. मागच्या एक-दीड वर्षात प्रताप दादांनी प्रत्येक गावाला भेट दिली प्रत्येक गावात विकास निधीची उपलब्धता केली कोट्यावधी रुपयाची विकास कामे पांदण रस्ते तर हे जग जाहीर आहेत, लोकांचे प्रश्न समजून घेतले शक्य तिथे लगेचच मदतही केली. प्रतापदादा याआधीही असे समाजकार्य मतदारसंघात करत होते आणि पुढेही ते सुरूच राहील आज लहान मुलांपासून तर वयोवृद्ध नागरिकांपर्यंत प्रत्येकांच्या तोंडी प्रताप दादाचं नाव आहे. ते फक्त अडसड यांच्या घराण्यातील आहे म्हणून नाही तर त्याच्या कामाकडे विचारांकडे पाहून लोकांनी त्यांना आपलंसं केलं. प्रतापदादामसाठी प्रतिकूल वातावरण लोकांनीच काही दिवसात बदलले. इथल्या जनतेला प्रतापदादाचे विचार, दृष्टी आणि काम पटलं. विरोधात असणारे सुद्धा नेता असावा तर प्रतापदादा सारखा असं म्हणू लागले. प्रतापदादाच्या गावागावातील सभांना भरभरून प्रतिसाद मिळत होता. प्रतापदादा निवडून आल्यावर सहा-सात वर्षातच धामणगाव रेल्वे मतदारसंघाचा चांगला विकास करेल हा विश्वास खरा झाला होता. जनतेच्या विश्वासावर दादा खरे उतरले आणि इथली विकासाची काम पहायला जिल्ह्यातून नव्हे तर राज्यभरातील मान्यवर सुद्धा भविष्यात येतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी व्यक्त केला होता. प्रताप दादांचा झालेला विजय विश्वासाची नांदी आहे असं आपण खात्रीने सांगू शकतो. प्रतापदादाच्या प्रचारासाठी पक्षातील ज्येष्ठ नेते, विविध क्षेत्रातील मान्यवर आवर्जून येवू लागले. प्रताप दादा चे विचार आणि प्रचार पाहून महाराष्ट्रातील अनेक संघटनांनी आपला पाठिंबा जाहीर केला. कामानिमित्त धामणगाव रेल्वे मतदारसंघाच्या बाहेर असलेल्या कित्येक मंडळींनी,मतदारांनी आवर्जून मतदारसंघात येऊन पहिल्यांदाच मतदान केलं व शक्य ती मदत केली. हातावर बोट असणारे काही नातं नसलेले असे अनेक हितचिंतक राज्यभरातून केवळ प्रतापदादा चा काम पाहून मदती साठी धावून आले मतदारसंघातील महिलांनी सुद्धा प्रताप दादाला विजयी करण्यासाठी मोलाची भूमिका बजावली जाती-पातीचे राजकारण खोटी आश्वासनं पैसा दारूची आणि अशा प्रचलित राजकीय समीकरणांना बाजूला ढकलून प्रामाणिकपणे लोकांसाठी काम करत राहिल्यास जनता तुम्हाला निवडून देण्याची जबाबदारी घेते हेच प्रतापदादा च्या विजयाने दाखवून दिलं. कोणताही भेदभाव न करता सर्वसमावेशक राजकारण कसं करावं हे प्रतापदादा कडून शिकावं यामुळेच राज्यातील इतर मतदारसंघातही मतदारांना प्रतापदादा हवेहवेसे वाटतात. सुरुवातीचं प्रतिकूल वातावरण ते अर्ज भरताना चा लोकांचा पाठिंबा आणि आजचा हा भव्य विजय हा ३६० अंशातला बदल म्हणजे प्रताप दादांवर लोकांनी टाकलेला विश्वास आहे. म्हणूनच हा विषय भव्य-दिव्य असा वाटतो आणि प्रत्येकाला तो विजय आपला वाटतो.
आपल्या नेत्याचा विजय आपला विजय वाटणे हेच लोकशाहीतील आदर्श राजकारण असतं म्हणूनच प्रतापदादा च्या रुपानं नव्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. असं आम्ही अभिमानाने सांगू शकतो प्रताप दादांनी आपल्या कर्तृत्वानं आणि जनतेच्या साथीने राजकारणात नवीन पायंडा पाडला. येत्या काही वर्षात हा आपला नवा दमदार आमदार प्रतापदादा अडसड धामणगाव रेल्वे मतदारसंघाचा कायापालट नक्कीच करेल. खरंतर आजकाल राजकारणात छोटी मोठी पदे मिळाली तरी नेत्यांचा नूर आणि ढंग बदलतो. त्यांची प्रत्येक गोष्ट सिलेक्टिव्ह होते, ठराविक प्रकारच्या लोकांमध्ये वावर वाढतो, याच प्रकारच्या कार्यक्रमाला जाणार, इतके लोक जमले तरच येणार, ठराविक मोठ्या लोकांच्याच उदघाटनाला जाणार किंवा अनेक प्रकारचे प्रोटोकॉल निर्माण केले जातात. परंतु आज यशाच्या शिखरावर पुढे सरकत असतांना आणि आमदार म्हणून परत निवडून येऊनही प्रतापदादांनी अश्या कुठल्याही प्रोटोकॉल, निकष किंवा सिलेक्शन मध्ये स्वतःला अडकवून घेतलेले दिसून येत नाही, ही खूपच सकारात्मक बाब म्हणावी लागेल. हीच गोष्ट भविष्यात या आमच्या युवा नेतृत्वाला यशाच्या सर्वोच्च शिखरावर नक्कीच घेऊन जाईल यात मला तरी शंका नाही. तरुण तडफदार आणि तितकाच सामाजिक जाणिव जपणारा आमदार महाराष्ट्राला मिळाला असं म्हणावं लागेल.जो समाजातील प्रत्येक घटकाला आपलं मानून पुढे मार्गक्रमण करतो आणि त्याच वेळी समाजातील प्रत्येक घटकाला सुद्धा तो आपल्यापैकी एक असल्याची जाणीव करून देतो. खरंतर धामणगाव रेल्वे मतदारांचे सुद्धा यानिमित्ताने अभिनंदन करायला हवं कारण त्यांनी अश्या नेतृत्वाला स्वीकारलं आणि मोठ्या मताधिक्याने निवडूनही दिलं. युवाहृदय सम्राट, शांत-संयमी, विकासपुरूष धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार प्रतापदादा अडसड यांना वाढदिवसाला शुभेच्छा…!!
वैभव मीनाक्षी सुभाषराव देशमुख
आमदार प्रतापदादा अडसड यांचा सामान्य कार्यकर्ता