संतांचे विचार आत्मसात करणे ही काळाची गरज असल्याचे मत रविभाऊ चौधरी यांनी मांडले. येथूनच जवळ असलेल्या दाभाडा येथे आयोजित महादेव बाबा जयंती महोत्सवात काल्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
महादेव बाबा जयंती महोत्सव हा तब्बल सात दिवस चालतो या कार्यक्रमांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते प्रामुख्याने राम धुन सामाजिक प्रार्थना सामुदायिक ध्यान अशा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून गावामध्ये चैतन्य निर्माण केल्या जाते.

याच जयंती महोत्सवामध्ये अखंड हरिनाम कथा भागवत कथा कीर्तन भजन व प्रवचनाची मालिका अखंडपणे सुरू राहते.
या जयंती महोत्सवाच्या समारोपिय कार्यक्रमांमध्ये संपूर्ण परिसरांमधून पालखी सोहळा मोठ्या प्रमाणात करण्यात येतो या पालखी सोहळ्यामध्ये परिसरांमधून प्रत्येक गावांमधून पालखी या ठिकाणी येते व त्यानंतर संपूर्ण गावांमधून राम धुन काढण्यात येते या रामधुनाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरापुढे साधुसंतांची प्रतिमा ठेवलेली जाते संपूर्ण गावांमध्ये रांगोळीच्या माध्यमातून संपूर्ण गावच जणू सजवल्या जाते त्यामुळे या गावांमध्ये असं वाटते की जणू संतांचीच भूमी निर्माण झाली की काय असा प्रश्नही बाहेर जाऊन आलेले भक्त मंडळी गण करतात.
महाप्रसादाची आयोजन मोठ्या प्रमाणात केले जाते या महाप्रसादांमध्ये किमान 25 ते 30 हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेतो हे या महादेव बाबा जयंतीच्या कार्यक्रमाची विशेष आहे.
या जयंती महोत्सवाला गावातील बाहेरगावी दिलेल्या मुली सहभागी होते व संपूर्ण नागरिकांकडे मोठ्या प्रमाणात पावणे मंडळींची रेलचेल असते हे या कार्यक्रमाचे विशेष असल्याचे या कमिटीच्या वतीने सांगण्यात आले आहे.















