वर्धा येथे विदर्भ शिंपी समाज मंडळाची सर्व साधारण सभा उत्साहात संपन्न

0
0
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

वर्धा येथे संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिर मठ मालगुजारी पुरा येथे विदर्भ शिंपी समाज मंडळाची सर्व साधारण सभा संपन्न झाली या सभेमध्ये प्रमुख उपस्थित म्हणून राष्ट्रीय ,अध्यक्ष श्री भास्करराव टोम्पें, विदर्भ शिंपी समाजाचे अध्यक्ष, राजुभाऊ किटे, तसेच विदर्भ शिंपी सचिव श्री प्रदीपभाऊ गंधे, मोरेश्वर उज्जवलकर, अविनाश नानोटे, रविंद्र भाबुरंकर, अविनाश ताठे, (पत्रकार) गजानन फिरके, पुलगाव येथिल अध्यक्ष सुदाम गचके, संयोजक मदनजी ढगे राजेश मुडतकर, रमेश जुमळे, राजु मनगटे, गौरव दिवसे, दुर्गेश भिवगडे, मठाचे अध्यक्ष सुरेशराव भुबंरकर, समन्वयक अनंत जागजोंड सर्व शिंपि समाज बांधव तथा ज्येष्ठ , श्रेष्ट मार्ग दर्शक,पुरूष व महिला पदाधिकारी ई. उपस्थित होते. सर्वप्रथम कार्यक्रमात मान्यवराचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. नंतर दिपप्रज्वलन करून फोटोचे पूजन करण्यात आले. नंतर समाजाच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली.विदर्भ शिंपी समाज मंडळ सशक्त करून मजबूत करणे.महिला व युवक मंडळाचे शिबीर कार्यशाला,मुला मुलीचे लग्न जोडण्यात अडचणीत येणाऱ्या ई.समस्येवर चर्चा करण्यात आली. नंतर कार्यक्रमात “लेक लाडकी शिंपि समाजाची”

वर्धा येथिल सौ. कांचन राजुभाऊ जौंजाळ व  युवा उद्योजक चि.अभिलाष घिमे, राजेश मुडतकर व याननां शाल ,श्रीफल व सन्मान चिन्ह देऊन पुरस्कार वितरीत करण्यात आले. नंतर राष्ट्रीय अध्यक्ष भास्करराव टोम्पें यांच्या हस्ते समाजाचे पत्रकार गजानन फिरके यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत त्याचे स्वागत करण्यात आले.सभेमध्ये सर्व शिंपि समाज बांधव मातृशक्ति,युवक ,युवती या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहुन सभा यशस्वी केली.कार्यकमाचे सुत्र संचालन वैभव गाजें यानीं केले तर आभार सुनंदाताई जुमळे यानी केले.

veer nayak

Google Ad