प्रशासकीय काळातील कचऱ्याचे ढीग नवनिर्वाचित नगरसेवकां च्या काळात करण्यात आले साफ

0
5
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चांदुर रेल्वे / मागील चार वर्ष अगोदर शहरातील आठवडी बाजारातील मुख्य नाला साफ करण्यात आला होता त्यावेळी नाल्यातून निघालेला जवळपास दीडशे ते दोनशे ट्रॅक्टर कचरा काढून नाल्याच्या काठावरच टाकण्यात आला,तेव्हापासून हे कचराचे ढीग तिथेच पडले होते, आठवडी बाजार असल्याकारणाने येथे भाजीपाले फळ विक्रेते आपले दुकाने लावतात या कचऱ्यातून निघणारे किडे भाजीपाल्याने फळावर बसते तर पावसाळ्याच्या दिवसात ्या ढिगार्‍यातून निघणारा गंडूळ पाण्यामुळे डायरिया सारखे अनेकांना आजार झाले होते, कचऱ्याचे ढिगारे उचलण्याकरिता अनेकांनी निवेदन देऊ वर्तमानपत्रात बातम्या सुद्धा प्रकाशित करण्यात आल्या होत्या मात्र न प प्रशासनाने त्यावेळी कोणतीच दखल घेतली नाही,मात्र नव्याने निवडून आलेल्या नगरसेवक व बांधकाम सभापती गजानन ठाकरे यांनी शहरातील या गंभीर समस्यांची दखल घेत जेसीपी ट्रॅक्टरच्या मदतीने हे ढिगारे आठवडी बाजारातून उचलून हा परिसर स्वच्छ केला,

veer nayak

Google Ad