इंजियर व ठेकेदार यांचेवर कार्यवाही करण्याची शेतकरी किरण शंकरराव दारवेकर यांची मागणी ..मंगरूळ दस्तगीर येथील मौजा डाफ अंबापुर शेत शिवारात शेत सर्वे न. 15/1 अ असुन किरण शंकरराव दारवेहकर यांची शेताला पश्चिमेस भिमरावजी पटले यांचे शेत असुन त्यांचे शेतातुन पुर्वी पासुन पाडवगळ (नाला) असुन तो मौजा शिदोडी शिवारातुन येतो व त्यानाल्याला भरपुर प्रमाणात पाणी येत असते.
परतु आपले कार्यालया मार्फत नाला खोली करणाचे काम करण्यात आले असुन आपले कार्यालयातील शेख जुनीयर इंजिनीयर यांनी समोरील कास्तकारा जवळुन हातमिळवणी करून त्यांचे शेतामधुन जाणारा नाला हा जुना जागेवरून न घेता समोर कास्तकारांना कोणत्याही प्रकारची माहीती न देता त्यांनी पाडवगळ (नाला) दुस-या दिशेने केला आहे तसेच शेख यांनी कोणत्याही प्रकारी शहानिशा न करता जिओ टेकींग सुध्दा केले नाही. व नाल्याची आखनी सुध्दा केली नाही. व नाला खोलीकरण हे त्यांनी कोणतीही जबादारी घेवुन केलेला नाही. त्यांनी त्यांचे कामामध्ये हजगर्जी पणा करून व नाल्याचे खोलीकरण हे त्यांनी माझे शेताचे दिशेने केले आहे त्याबाबत आम्ही श्री शेख जुनीयर इंजिनीयर यांना ठेकेदार यांना पाहणी करीता घेवुन गेलो असता.
त्यांनी आम्हाला म्हाला म्हटले की हया नाला खोलीकरणाचे काम रात्री झाल्यामूळे जेसिपी डॉयव्हर चे नजर चुकीने झाले आहे. आम्ही त्यांना म्हटले की आपण जोओटेकींग का केले नाही. चुना ची आखनी का केली नाही.तर आमचे जवळ येवढा वेळ नसतो जीओ टेकीग करायला व चुना आखुन दयायला अशा प्रकारचे त्यांनी उडवा उडवीचे उत्तर दिले. त्यांच्या व आऔपल्या विभागाचे हजगर्जीपणा मुळे माझे शेतामध्ये पाडवगळ (नाला) पाणी आल्यामुळे पीकाचे व शेताचे नुकसान झाले आहे. कास्तकार संदीप घरत इंदुबाई घरत किष्णाजी नेवारे बनाबाई नवारे नथ्थुजी ठाकरे रंगराव चंपतराव चौधरी पांढरंग मिसाळ या कास्काराचे सुध्दा नुकसान झाले आहे. यांची संपुर्ण जबाबदारी ही आपल्या विभागाची असल्यामूळे श नुकसान भरपायी भरून दयावी. व आपण केलेल्या नाल्याचे खोलीकरण हे नवीन दिशेने केलेले ते बुजवुन आपण ज्याजागेवरून जुना पाडवगळ (नाला) होता तेथुन खोलीकरण करण्यात यावे. व शेख ज्युनीयर इंजियर व ठेकेदार यांचेवर कार्यवाही करण्यात यावी.अशी मागणी किरण शंकरराव दाव्हैकर यांनी उपविभागीय अभियंता, उर्ध्व वर्धा पाटबंधारे जुना धामणगाव . यांना निवेदनातून केली आहे.