चांदुर रेल्वे /स्थानीय महावितरण विभागाच्या गलथन कारभारामुळे तालुक्यातील चिरोडी गावातील नागरिकांना हिंदू संस्कृती महत्वाची असलेले
दिवाळी सण व लक्ष्मीपूजन अंधारातच साजरा करावा लागला, यावेळी गावातील नागरिकांनी महावितरण विभागातील अधिकाऱ्यांना फोन लावूनी फोन नॉट रिचेबल येत होते,यामुळे गावातील नागरिकांनी महावितरण विभागा च्या प्रती रोष व्यक्त केले,
हिंदू संस्कृतीत दिवाळी सण व लक्ष्मीपूजन अतिशय महत्त्वाचा मानला जातो,या सणाच्या काही दिवसापूर्वीच लोक घरातील अंधकार दूर व्हावा म्हणून लाइटिंग लावण्या पासून तर घराचे रंग कामे करतात,मात्र दिवाळीच्या दिवशीच महावितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे गावातील लाईन 05 वाजता पासून तर रात्री 09,वाजेपर्यंत बंद होती त्यामुळे गावातील नागरिकांना अंधारातच लक्ष्मीपूजन करावे लागले, तर रात्री नऊच्या नंतर लाईन येऊन सुद्धा विजेचे दाब कमी असल्याकारणाने नागरिकांना वीना पंख्या ने रात्री झोपावे लागले तर सकाळी कमी होल्टेज च्या दाबा मुळे गावातील पाणीपुरवठा सुद्धा होऊ शकला नाही यावेळी अनेकांनी महावितरण विभागाच्या या गलथान कारभाराबद्दल आपला रोष व्यक्त केला,
दिवाळी सारखा महत्त्वाचा सण दिवाळी हे आम्हाला अंधारात साजरा करावा लागला वारंवार लाईन बंद होणे हे नेहमीचे असून अधिकाऱ्यांना फोन लावले असता ते सुद्धा लक्ष देत नाही,
दारासिंग राठोड, माजी सरपंच चिरोडी
यावेळी येथील कार्यरत अभियंता यांना वारंवार फोन करून सुद्धा कोणताही रिस्पॉन्स मिळाला नाही













