दर्यापूरातील काँग्रेस शुन्यातुन उभी करत पक्षाने मला सर्व पदावर विराजमान केले त्यामुळे पक्ष सोडण्याचा प्रश्नच येत नाही सहकार नेते सुधाकर पाटील भारसाकळे यांनी दिला अफवेला पूर्णविराम !

0
34
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

दर्यापूर(प्रतिनिधी)-

मी राजकीय कारकिर्दीत व सहकार क्षेत्रात आजपर्यत असंख्य पदावर काम केले असून मला या पदावर काम करण्याची संधी काँग्रेस पक्षाचे दिली आहे,त्यामुळे पक्ष सोडण्याचा प्रश्नच येत नाही असे रोखठोक मत अफवेला पूर्णविराम दिला दर्यापूरचे सहकार नेते,तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे यांनी व्यक्त करत विरोधकांनी उठवलेल्या अर्थहीन चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
सहकार नेते सुधाकर पाटील भारसाकळे यांना काँग्रेस पक्षात डावलल्या जात आहे, त्यामुळे ते सुद्धा वरिष्ठ नेत्यावर नाराज असल्याने ते काँग्रेस पक्षाला रामराम करणार असल्याची अफवा विरोधकांकडून हेतुपुरस्सर पसरविण्यात येत असल्याने यावर त्यांनी आपले मत व्यक्त केले.
तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट किंवा शिवसेना उध्दव ठाकरे गट मध्ये जाणार असल्याचे सुद्धा अफवा विरोधकांकडून पसरविण्यात आले आहेत.
यावर बोलताना ते म्हणाले की दर्यापूर तालुक्यात काँग्रेस पक्ष पूर्णतः संपला होता,कोणी नेतृत्व करायला समोर येत नव्हते त्या काळात वरिष्ठ नेत्यांनी मला तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे,त्यामुळे तालुक्यातील गावागावात काँग्रेस पक्षाची बांधणी व कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी मी प्रचंड मेहनत घेतली आहे,त्यामुळेच आज दर्यापूर विधानसभा मतदारसंघ,जिल्हा परिषद,पंचायत समिती, नगरपरिषद व तालुक्यातील असंख्य ग्राम पंचायत आणि सेवा सहकारी सोसायटी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आहेत,आज तालुका पूर्णतः काँगेसमय झाला आहे,त्यामुळे मी पक्ष सोडण्याचा प्रश्न निर्माण होत नाही.
यासोबत मला आजपर्यत जिल्हा बँकेचे संचालक,अध्यक्ष, खरेदी विक्री संघ संचालक व कृषी उत्पन्न बाजार समिती अशा अनेक पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे,ही संधी मला काँग्रेस पक्षाने दिली आहे.
त्यामुळे मी काँग्रेस पक्षामध्ये पूर्ण समाधानी असून येणाऱ्या काळात काँगेस पक्षाचं तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वलय वाढवून सर्व निवडणूक जिंकण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सुधाकर पाटील म्हणाले. दर्यापूर शहरात काँग्रेस जिवंत ठेवण्यासाठी मी अद्याप पर्यंत कर्तव्याप्रति एकनिष्ठ राहिलेला आहे यापूर्वी सुद्धा माझ्या अस्तित्वावर विरोधकांनी वायू वेगाने अर्थहीन चर्चा रंगवल्या होत्या त्या सुद्धा हवेतच विरघळल्या परमेश्वर माझ्या पाठीशी आहे मी माझ्या कर्तव्याप्रती प्रामाणिक असल्याचे मत यावेळी प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केले

veer nayak

Google Ad