प्रतिनिधी
भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे जनतेचा कौल हा निवडणुकीत महत्त्वाचा मानला जातो दर पाच वर्षांनी विधानसभा लोकसभा यासह विविध संस्थांच्या निवडणुका होत असतात भारत हा जगातील एकमेव असा देश आहे की सतत पाच वर्ष निवडणुका जातीयवादाच्या भरवशावर लढविल्या जातात कुठल्याही उमेदवाराने निवडून आल्यानंतर पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा सादर करावयाचा असतो कोणती विकासकामे पूर्णत्वाकडे नेली हे सुद्धा व्यक्त करणे स्वाभाविक आहे परंतु असे कुठेही दिसून येत नाही केवळ हिरवा निळा भगवा हा अजेंडा प्रामुख्याने निवडणूक काळात उफाळून येत असतो एकंदरीत मतदार राजाला जातीयवादाची भूल दिली जाते हे कुठेतरी थांबणे काळाची गरज आहे निवडणुकीच्या काळात काही क्षणापुरते भाव कमी केले जाते विविध फसव्या योजना कार्यान्वित केल्या जातात तर आचारसंहिता लागायच्या काही क्षणा अगोदर सुद्धा सत्ताधारी आपले उद्घाटन समारंभ केवळ नावासाठी पार पाडतात त्या विकास कामांवर सुद्धा शंका कुशंका निर्माण झालेल्या असतात आपल्या मर्जीतील ठेकेदारांना संपूर्ण कार्यकाळात कामे दिली गेली तरी अमरावती जिल्ह्यातील सुज्ञ नागरिकांनी यावेळी प्रचारादरम्यान देण्यात फसव्या भूलथापाला बळी पडू नका तर गेल्या पाच वर्षात जगाचा पोशिंदा शेतकरी राजा हा कसा उदरनिर्वाह करतो आपली उपजीविका कशी भागवतो हे सुद्धा आठवणे कर्मप्राप्त आहे पूर्वीच्या काळी सर्व कामे ऑफलाइन पद्धतीने व्हायची त्यामध्ये सुद्धा सुत्रता असायची कमी वेळात शासकीय कार्यालयातील अधिक कामे मार्गी लागत असत आता मात्र ऑनलाइन च्या नावाखाली शासकीय कार्यालय बँका ह्या पायदळी तुडवावे लागतात शेतकरी राजाला शेती पेरणी पासून तर उत्पन्न बाजारपेठेत विक्री पर्यंत अशा अनेक असह्य यातना सोसाव्या लागतात पूर पिकामुळे झालेले नुकसान त्या पंचनामासाठी झालेला विलंब व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची वाहवा करणे हे सर्वसामान्य नागरिकांना करावे लागते कर्जमाफी पुनर्गठण यासह अनेक फसव्या आश्वासनांची खैरात होत असताना आता बघायला मिळणार आहे तरी आपल्या मर्जीतील सुज्ञ अभ्यासू वृत्तीतील लोकसभेचा उमेदवार हा निवडून देणे अति महत्त्वाचे आहे तुमचे एक बहुमोल मत सत्ता बदलविण्यासाठी ताकद ठरते हे विसरता कामा नये तरी मतदार राजांनी भुलथापाला बळी पडू नये