चांदुर रेल्वे / दिवसेंदिवस शहरातील बिघडत असलेल्या वाहतुक व्यवस्थेला सुरळीत करण्याकरिता शहरात नावाने रजू झालेले ठाणेदार मंगळवारच्या सकाळी स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक ला सुरळीत केले, यावेळी त्यांनी रस्त्यावरील कुठे ही उभे करण्यात आलेल्या वाहन मालका ना चलान न करता तोंडी समज देऊन समजून सांगितले,
शहरातील रेल्वे स्टेशन पासून तर सिनेमा चौकापर्यंत ज्यामध्ये विरूळ चौक,तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय,तसेच बाळासाहेब ठाकरे चौक ते सिनेमा चौकापर्यंत तसेच गाडगेबाबा मार्केटमध्ये सुद्धा लोक आपले वाहन सुरळीत न लावता कुठे ही ठेवले जाते, या वाहनामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था बिघडत असून लहान-मोठे अपघात सुद्धा झाले आहे, तर कित्येक वेळा अशा ठिकाणी वाहतूक जाम होते शहरातील वाहतूक व्यवस्थेला सुधारण्याकरिता दोन वाहतूक शिपायाची नेमणूक सुद्धा आहे, तरी शहरातील वाहतूक व्यवस्था हे दिवसेंदिवस अस्तव्यस्त होताना दिसत आहे,या अस्त व्यस्त झालेल्या वाहतुकीला सुरळीत करण्याकरिता नव्याने रजू झालेले ठाणेदार यांनी मंगळवारी सकाळी स्वतः रस्त्यावर उतरून वाहन धारकांना तोंडी समजून सांगितले, ठाणेदारांच्या या कारवाईमुळे शहरातील लोकांनी त्यांचे आभार सुद्धा व्यक्त केले,