चांदूर रेल्वे – (ता. प्र.)
अमरावती जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने 13 डिसेंबर रोजी युगात्मा स्व. शरद जोशी यांची दहावी पुण्यतिथी तसेच हुतात्मा झालेल्या शेतकऱ्यांच्या स्मरणार्थ शहीद दिनाचा कार्यक्रम चांदूर रेल्वे तालुक्यातील शहीद स्मारक, नेकनानपुर येथे भावपूर्ण वातावरणात पार पडला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित बहाळे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार अॅड. वामनराव चटप तसेच हुतात्मा शहीद प्रकाश काळे यांच्या मातोश्री अनुसया काळे यांची उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्व. शरद जोशी यांच्या जीवनकार्यावर विविध पैलूंनी प्रकाश टाकत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज व्यक्त केली. शेतकरी हितासाठी त्यांनी दिलेल्या लढ्याचा व विचारांचा उपस्थितांनी गौरव केला. कार्यक्रमात शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष राजाभाऊ पुसदेकर, युवा आघाडी अध्यक्ष सतीश दानी, जिल्हाध्यक्ष माधव गावंडे, विदर्भ राज्य महिला आघाडी अध्यक्ष रंजना मामर्डे, विदर्भ प्रमुख आर. पी. राजपूत, माजी जिल्हाध्यक्ष दिनकर निस्ताने, सतीश देशमुख, माया पाटील, स्मारक समिती अध्यक्ष शिवाजी चौधरी, राजाभाऊ आगरकर आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष दिनकर निस्ताने यांनी केले. सूत्रसंचालन धामणगाव तालुकाध्यक्ष दिवाकर राऊत यांनी केले, तर आभार प्रदर्शन चांदूर रेल्वे तालुकाप्रमुख सुधाकर थेटे यांनी मानले. या कार्यक्रमास शेतकरी संघटनेचे नारायण सिरस्कार, अशोक बोबडे, वसंत सावंत, सुदाम सरोदे, दिलीप वानखडे, अशोक देशमुख, अशोक वानखडे, स्वप्निल वाकोडे, सागर गावंडे, शुभम काळे, रामेश्वर काळे, पुरुषोत्तम मारोटकर, धनराज मोहोड, जीवन पचगाडे, अरुण लोखंडे, रणजीत राऊत, विनोद कडू, बाबाराव जाधव, अशोक हांडे, सुशील कचवे, धनराज गोटे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.















