तेली समाजाचा ऐतिहासिक राज्यस्तरीय सोहळा — एकतेचा, उन्नतीचा आणि नवदिशेचा शुभारंभ!

0
21
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

“हा फक्त एक कार्यक्रम नाही… ही आहे तेली समाजाच्या आत्मभानाची, यशाची आणि सामाजिक ऐक्याची सुरुवात!”

कैलास-छाया गिरोळकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सौजन्याने आणि यश असोसिएट्स व आसरा रेस्टॉरंट, अमरावती यांच्या सहकार्याने, “तेली समाज-भूषण गुणवंत विद्यार्थी सत्कार व उद्योजक मेळावा” या भव्य राज्यस्तरीय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण: 

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव:

शैक्षणिक, क्रीडा, कला व इतर क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान.

 यशस्वी उद्योजकांचा मेळावा:

छोटे-मोठे सर्व प्रकारचे व्यवसाय करणाऱ्या समाजबांधवांना नेटवर्किंग, व्यवसाय मार्गदर्शन व बिझनेस डिरेक्टरी सादरीकरण.

समाज भूषण पुरस्कार:

राज्यभरातील ११+ विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या समाजातील मान्यवरांचा विशेष गौरव.

विशेष उपस्थिती:

श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेब                                        महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री व अमरावती/नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री

– समाजाच्या उन्नतीसाठी त्यांचे अमूल्य मार्गदर्शन व आशीर्वाद लाभणार.

प्रेरणादायी सत्र:

श्री. सुशील आगरकर – प्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर व बिझनेस कोच                                                                     

व्यवसाय वृद्धीसाठी आधुनिक दृष्टिकोन, स्टार्टअप संस्कृती, व आत्मनिर्भरतेसाठी खास व्याख्यान.

 

कार्यक्रमाचा तपशील:

तारीख: शनिवार, १९ जुलै २०२५

वेळ: सकाळी १० वाजता

स्थळ: सांस्कृतिक भवन, अमरावती

स्नेहभोजन: सर्व मान्यवरांसाठी भोजन व्यवस्था

प्रा. स्वप्निल खेडकर यांचे समाज बांधवांना आवाहन

veer nayak

Google Ad