सांगळूदकर महाविद्यालयाचा विध्यार्थी तेजस पारीसेची एक्ससिस बँकेत निवड  

0
6
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

दर्यापूर- येथील श्री.शिवाजी शिक्षण संस्था द्वारे संचालित जे.डी.पाटील सांगळूदकर महाविद्यालयातील वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतील एम.कॉम,भाग १ चा विद्यार्थी तेजस परीसे यांची महाविद्यालयात झालेल्या एक्ससिस बँकेच्या मुलाखती मधून ‘रिलेशनशिप एक्झिक्यूटिव्ह’ या पदावर एक्ससिस बँकेच्या दर्यापूर शाखेत निवड करण्यात आली आहे. त्याच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अतुल बोडखे यांनी तेजस पारीसे अभिनंदन केले तसेच त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट साठी महाविद्यालय सदैव प्रयत्नशील असते तसेच या संदर्भात महाविद्यालयातील प्लेसमेंट सेल सक्रिय आहे असे आवर्जून सांगितले. इतर विद्यार्थ्यांनी सुद्धा याचा लाभ घेतला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी डॉ. मंगलावती पांण्डेंय, वाणिज्य व व्यवस्थापन शाखा प्रमुख,प्रा मनिष होले, समन्वयक, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष ( IQAC) तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

veer nayak

Google Ad