गेले अनेक :दिवसापासून रास्त भाव धान्य दुकानदारांचे अनेक समस्याचे प्रश्न शासनाकडे प्रलंबित असून अनेक वेळा निवेदन देऊन ही या प्रश्न सोडविण्यात आले नसल्याने दि. 5 रोजी येथील इतर राज्य संघटनेणे दर्शविलेल्या समस्यांची पूर्तता करण्यासाठी सर्व रास्त भाव धान्य दुकानदारानी ई-पॉस मशीन तहसीलदार गोविंद वाकडे यांच्या कडे जमा केले व निवेदन देण्यात आले त्यात जेव्हा शासन आमच्या समस्यांचे निराकरण करेल तेव्हा
आम्ही इ पॉस मशीन परत स्वीकारली जाईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. इंटरनेट सेवा सव्हेर प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्या बाबत. महागाईच्या इस्टांकानुसार प्रती किंटल 300 रुपये कमिशन देण्यात यावे. केवायसी मोबदला कमीत कमी प्रतिव्यक्ती 50 रुपये देण्यात यावे. अशी त्यांची मागणी आहे. यावेळी धामणगाव रेल्वे रास्त दुकानदार संघटनेचे अध्यक्ष दिवाकर ठाकरे उपाध्यक्ष व जिल्हाप्रसिद्धी प्रमुख मिलिंद पहाडे सचिव प्रमोद काकरिया व तालुक्यातील सर्व ९८ दुकानदार सा प्रसंगी हजर होते