मा. श्री दत्ताजी मेघे बालकल्याण शिक्षण संस्था द्वारा संचालित एस ओ एस कब्स येथे शिक्षक दिवस साजरा करण्यात आला. दरवर्षी शिक्षक दिवस 5 सप्टेंबर रोजी संपूर्ण भारतात साजरा केला जातो.कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती आणि डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली प्री प्रायमरी हेड मा. शबाना खान मॅडम आणि शिक्षिका प्रणिता जोशी मॅडम यांनी शिक्षकदिनाविषयी माहिती सांगितली. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो.
आपल्या जीवनात शिक्षकांचे काय महत्व असते शिक्षक आपल्याला कसे घडवतात हे विद्यार्थ्याना समजावून सांगितले. KG 2 च्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भुमिका साकारून विद्यार्थ्यांना शिकविले. विद्यार्थ्यांनी हाताने बनवून आणलेले ग्रीटिंग कार्ड व पुष्पगुच्छ शिक्षकांना भेट म्हणुन दिले. मुख्याध्यापिका प्रचिती धर्माधिकारी मॅडम आणि प्रि प्रायमरी हेड शबाना खान मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमच्या यशस्वीतेकरिता प्रणिता जोशी, रेणुका सबाने, वर्षा देशमुख, आकांक्षा महल्ले, राणी रावेकर, प्राजक्ता दारूंडे श्रध्दा राॅय, अश्विनी नांदणे यांनी सहकार्य केले.