तालुका मराठी पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम..ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना व मूकबधिर विद्यार्थ्यांना केले फळे व बिस्किटांचे वितरण…

0
18
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चांदूर रेल्वे प्रतिनिधि 

 अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघ अंतर्गत चांदूर रेल्वे तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक ६ जानेवारी रोजी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जयंतीचे तसेच मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून स्थानिक ग्रामीण रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांना तसेच सोनगाव येथील मूकबधीर विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांना फळे व बिस्किटांचे वाटप करून समाजिक दायित्व पार पाडले. फळे वाटपाचा हा कार्यक्रम ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.पवार व नैत्रतज्ञ श्रीमती काळे ,तसेच विविध समाजिक संघटनाचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.याप्रसंगी माजी नगराध्यक्ष शिट्टू उर्फ निलेश सूर्यवंशी , समाजिक कार्यकर्ते पप्पू उर्फ निलेश भालेराव ,पप्पू सोळंके ,ऍड. राजीव अंबापुरे , तालुका केमिस्ट व ड्रगिस्ट संघटनेचे बाळू कडू ,राजू अजमिरे ,अंकुर खाकोले अजमिरे असे अनेक पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते. ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण उर्फ गुड्डू शर्मा तर प्रस्ताविक संघटनेचे सचिव बंडू आठवले यांनी केले तर आभार प्रदर्शन अतुल उज्जैनकर यांनी केले.

सामाजीय दायित्वाचे सातत्याने निर्वहन करणाऱ्या तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण उर्फ गुड्डू शर्मा, उपाध्यक्ष मंगेश बोबडे, सचिव बंडू आठवले, शहराध्यक्ष राजेश सराफी, शहर उपाध्यक्ष अभिजीत तिवारी तसेच संघटनेचे पदाधिकारी अमोल ठाकरे, प्रा. सुधीर तायडे, हरीश ढोबळे, प्रमोद इंगळे, मनोज गवई , सुभाष कोटेचा ,दिनेश जगताप व अतुल उज्जैनकर यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठीं परिश्रम घेतले.

veer nayak

Google Ad