वार्ताहर तळेगाव दशा
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शेतकरी बांधवांनी बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा केला या बैलपोळ्या करतात दहा ते पंधरा दिवसा अगोदरपासूनच तयारी केल्या जाते यामध्ये बैलांचा साज व मठाती मोठ्या कौशल्याने तयार केला जाते व ज्या पोळ्यात तो बैल घेऊन जातो तेथे त्याचा व त्याच्या बैलाचा प्रथम क्रमांक कसा येईल त्याकडे त्याची लक्ष असते त्याकरता तो शेतकरी बैलांची उत्कृष्ट सजावट करून पोळ्यामध्ये आपल्या जोडीला घेऊन जातो यामध्ये उत्कृष्ट मठाती,सुदृढ जोडी, सजावट इत्यादी गुणांचा हिशोब करून बैल जोडीला प्रथम द्वितीय व द्वितीय क्रमांक देऊ बक्षीस दिले जाते.
येथे पाच ठिकाणी बैलपोळा भरल्या जातो त्यामध्ये पाण्याचे टाकीजवळ, आठवडी बाजारात, लोखंडी महाराज मंदिराजवळ, महादेव मंदिर,वॉर्ड नंबर दोन मधील स्मशानभूमी जवळ असे एकूण पाच ठिकाणी बैलपोळा भरवल्या जाते या संपूर्ण बैलपोळ्याचा मोठा इतिहास आहे. प्रत्येक ठिकाणी तीन बक्षीस दिले जाते तर काही ठिकाणी फिरती ढाल दिल्या जाते याकरता शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात भाग घेत असतात व अती उत्साहात हा सन साजरा करण्यात येतो. यासना त आदल्या दिवशी बैलांना त्यांच्या खांद्यांना तू लोणी लावून त्यांना दुसऱ्या दिवशी जेवणाच्या आमंत्रण दिले जाते व पोळ्याच्या दिवशी घरी बनवलेले गोडधोड खायला दिल्या जाते.