तळणी ग्रामपंचायत च्या सरपंचा सौ प्रीती ताई पचारे यांच्या राजीनाम्या नंतर दी 7.03.2024 रोजी सरपंच पदासाठी निवडणूक पार पडली. एकच नामनिर्देशन पत्र दाखल झाल्यामुळे सौ माधुरीताई मारोती जानोस्कार यांची सरपंच म्हणून अविरोध व एकमताने निवड करण्यात आली.
नवनियुक्त सरपंच सौ माधुरी जानोस्कार यांना पुष्पगुच्छ देऊन माजी सरपंच व ग्रापं सदस्य सौ प्रीती पाचारे यांनी शुभेच्छा दिल्या. ग्रापं चे उपसरपंच श्री विशाल भैसे , ज्येष्ठ सदस्य श्री सुधाकरराव लकडे, सौ अनिता पारखंडे, सौ सुवर्णा कोल्हे, श्री अविनाश धुर्वे यांनी सुध्दा शुभेच्छा दिल्या, व निवडणूक अविरोध होण्यास सहकार्य केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार ) चे ज्येष्ठ नेते व जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्री विजयराव भैसे यांनी नवनियुक्त सरपंच चे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच पुन्हा एकदा निवडणूक अविरोध केल्याबद्दल सर्व सदस्यांचे कौतुक केले व एकदिलाने गावच्या विकासाची कामे करण्याचा सल्ला दिला.
निवडणूक करिता अध्यासी अधिकारी म्हणून श्री व्यकटी कांबळे, मंडळ अधिकारी, चिंचोली यांनी काम पाहिले. व ग्रापं सचिव श्री नरेन्द्र शिंदे यांनी निवडणूक सभेची व्यवस्था सांभाळली. पोलिस पाटील श्री तुषार सिरस्कर व मंगरूळ पोलिस स्टेशन चे बीट जमादार श्री महादेवराव पोकळे यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याचे दृष्टीने कामकाज पाहिले. ग्रांप कर्मचारी श्री अंकुश कोल्हे व श्री आतिश मुंगभाते यांनी कार्यालयीन व्यवस्था चोख पणे केली.