ताळ मृदुंगाच्या गजरात उत्तमसरा येथे तिथीनुसार शिवजयंती साजरी नितीन कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत रंगला रिंगण सोहळा

0
25
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

प्रतिनीधी/अमरावती

दरवर्षप्रमाणे यावर्षीही बडनेरा शहर व ग्रामीण भागातील विविध परीसरात तिथीनुसार शिवजयंती उत्सव सोहळा बघावयाला मिळाला. दरम्यान ग्रामीण भागातील उत्तमसरा येथे आयोजित शिवजयंती उत्सव सोहळ्यात वेगळाच हर्षोल्लास पाहायला मिळाला. सदर सोहळ्याला ताळ मृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. रिंगण सोहळा कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणुन नितीन कदम यांनी आपली विशेष हजेरी लावली.


उत्तमसरा ग्रामस्थांच्या उपस्थितीत शिवआर्ती व स्मारकाचे पूजन करून ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुका, शिव वंदना, स्वराज्य रथ, छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम गाणारे पोवाडे, मर्दानी खेळ अशा वातावरणात तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली.

यावेळी संकल्प शेतकरी संघटनेचे नितीन कदम,अभिषेक सवाई पाटील,आनंद ठाकरे, प्रणव सवाई, प्रतीक इंगोले, समर्थ ठाकरे,धीरज सवाई,शुभम अवचार, प्रणय वऱ्हाडे, अनिकेत ठाकरे,विशाल मुंदाने, कार्तिक गावंडे, प्रतीक पवार, अनिल सवाई, राजेन्द्र सवाई, प्रवीण सवाई, गोपाळराव झाडे, ज्ञानेश्वर ठाकरे, सुभाषराव सवाई, रणजित सवाई, संतोष सवाई, संजय ठाकरे, प्रज्वल सवाई, डॉ. सवाई विनायक सवाई, प्रल्हाद सवाई, डॉ. मालधुरे, शेखर सवाई, आशिष सवाई, किशोर गवळी, विशाल सवाई, योगेश पेढेकर व समस्त ग्रामास्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

veer nayak

Google Ad