बीसीजी लस घेणे हे सर्वांचे आरोग्याच्या दृष्टीने अति महत्त्वाचे आहे

0
31
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

त्यामुळे सर्वांनी लस घ्यावी असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी हर्षल सिरसागर यांनी कावली येथे आयोजित बीसीजी लसीकरण सत्र आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप इंगळे होते तर प्रमुख अतिथी म्हणून चंदाताई जांभळे सरपंच, डॉ.हर्षल सिरसागर तालुका वैद्यकीय अधिकारी, मनीष निरगुंडे, जयस्वाल साहेब, डॉ. वीरेंद्र नारनवरे वैद्यकीय अधिकारी कावली शैलेश टाले धर्मा वानखडे, मेश्राम ताई, पुनम तायडे औषध निर्माता, अश्विनी पोलादे ग्रामसचिव, राजेश धूपम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
श्री मुक्त भारत होण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी सहकार्याची भावना मनामध्ये बाळगणे तेव्हाच भारत हा क्षय मुक्त होऊ शकतो असे निरगुंडे यांनी आपले मत मांडले.
या लसीकरण सत्र सुरू असताना गावातील नागरिकांनी लाभ घेतला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार धर्मा वानखडे यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता कावली येथील वैद्यकीय कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका व आशा सेविका ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

veer nayak

Google Ad