तळेगाव येथे शॉट सर्किट मुळे आग

0
55
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

तळेगाव दशासर :- स्थानिक येथील प्रभाग क्र. एक येथील मारोती चंपत काटकर यांच्या घराला शॉट सर्किटमुळे आग लागल्याची घटना ५ फेब्रुवारी सायंकाळ पाच वाजताच्या सुमारास घडली

अधिक माहितीनुसार सदर ठिकाणी ज्वलनशील काळ्या व लाखूड ठेवलेले होते व त्याच्या वरून पोल वरील विजतार गेलेला असल्याने अचानक शॉट सर्किट झाल्या मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केल्या जात आहे. यामध्ये सदर ठिकाणी ठेवलेल्या काड्या व लाखडे पूर्णतः जळाली असून सुदैवाने कोणतेही जीव हानी झाली नसून घर पूर्णतः जळून खाक झाले आहे. यावेळी धामणगाव रेल्वे येथील अग्निशमन दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आले.ह्या आगी मुळे काटकर हयांचे अंदाजे 60/70 हजाराचे नुकसान झाल्या चे प्राथमिक अंदाज आहे

veer nayak

Google Ad