ताबडतोब सोलसे यांची केली बदली नवीन ठाणेदार सतीश डेहनकर यांनी घेतला पदभारकदम प्रकरण, तक्रार न घेतल्याने दोन पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई

0
445
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आर्वी, ता. प्रतिनिधी/ पंकज गोडबोले

आर्वी : येथील बॅक आफ इंडियाच्या नागपुर शाखेने लिलाव केलेल्या जागेच्या व्यतिरिक्त अजय कदम यांच्या मालकीच्या जागेवर जबरदस्ती कब्जा करण्याप्रकरणी तक्रार दाखल करुन न घेणाऱ्या ठाणेदार यशवंत सोलसे यांची ताबडतोब बदली करण्यात आली असुन त्यांच्या जागी सतिश डेहणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर, स्टेशन डायरीवर असणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार आहे

विशेष म्हणजे या प्रकरणात काल सकाळी नऊ वाजता एस पी अनुराग जैन आणि ॲडिशनल एस पी डॉक्टर सागर कवडे आर्वीत तळ ठोकून होते त्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र 

दिलीप पाटील भुजबळ यांनी आर्वी गाठून या प्रकरणाची रात्री ९ वाजेपर्यंत माहिती घेतली होती.

विशेष पोलीस महानिरीक्षक आल्याने घटनास्थळी जाऊन सखोल चौकशी केल्याने आर्वीत चांगलीच खळबळ उडाली होती. 

या प्रकरणात नगरपालिका महसूल विभाग भुमिअभिलेख बँक वन विभाग पोलीस यंत्रणा सगळीच कामाला लागली होती.

अनेकांचे बयान घेण्यात आले जबाब नोंदविण्यात आले.

 _____

     पोलीस ठाण्यात तक्रार घेवुन येणाऱ्याची तक्रार घेणे हे पोलीसांचे आध्य कर्तव्य असुन त्यानंतर तपास करुन गुन्हा नोंद करणे आवश्यक आहे. त्या दिवसाचे पोलीस डायरी अधिकारी गजानन मरस्कोल्हे होते तर, स्टेशन डायरी अमंलदार सतिश नंदागवळी हे होते यांनी ठाणेदार यशवंत सोलसे यांच्या आदेशाशिवाय तक्रार घेण्यास नकार दिला त्यांनी अजय कदम यांना बसवुन ठेवले. परिणामी आमदार सुमीत वानखेडे यांनी पोलीस स्टेशन गाठले तेव्हा त्यांची तक्रार दाखल करण्यात आली. याची सुध्दा पोलीस महानिरीक्षक दिलीप भुजबळ यांनी माहिती घेतली आणी ठाणेदार यशवंत सोलसे यांची तडकाफडकी बदली केली तर, सतिश नंदागवळी व गजानन मरस्कोल्हे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

_________

पोलीस निरीक्षक सतिश डेहणकर यांनी घेतला पदभार

     वर्धा येथील पोलीस अधिक्षक कार्यालयात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक सतिश श्रीराम डेहणकर यांनी आर्वी येथील पोलीस स्टेशनच्या ठाणेदार पदाचा ताबडतोब पदभार सांभळला असुन त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासोबत प्रकरणाची चर्चा सुध्दा केली आहे.

_____

लिलावात नसलेल्या या मालमत्तेचा कब्जा घेण्याचा प्रयत्न

बस स्थानका लगतच्या वंसत नगर मधील अजय कदम यांचे प्लॉट क्रमांक चार वरील घर नागपुर येथील बँक आफ इंडिया कडे गहाण होते. हे घर नागपुर येथील राकेश खत्री याने २२ डिसेंबर २०२३ ला झालेल्या लिलावात विकत घेतला याची गुरूवारी (ता.२३) खरेदी करण्यात आली व शुक्रवारी (ता.२४) ताबा सुध्दा घेतला. दुसरे दिवशी या व्यवहारासोबत काही संबंध नसतांना अँड. दिपक मोटवाणी हे चार पाच लोकांना सोबत घेवुन अजय कदम यांच्याकडे गेले आणी लिलावविक्रीत नसलेल्या घराला जबरीने कुलूप लावुन कब्जा करीत होते. त्याला त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला 

 अजय कदम यांच्या डोळ्यादेखत त्यांनी लिलावात विक्री न झालेल्या जागेला काही व्यक्तींच्या सहकार्याने कुलूप लावले.

——————-

 येथील व्यापारी संघटनेने यात सहभाग घेतला आणी वर्धा जिल्हा पोलीस अधिकारी अनुराग जैन याना निवेदन दिली आणी ॲड. दिपक मोटवाणी यांनी दिलेल्या तक्रारीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.

_________

अशी झाली तक्रार दाखल

याची तक्रार करण्याकरीता अजय कदम हे त्याच वेळी शनिवारी (ता.२५) पोलीस ठाण्यात पोहचले मात्र पोलीसांनी त्यांची तक्रार घेतली नाही . दुसरे दिवशी रवीवारी (ता.२६) सगळे अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी झेंडावंदन कार्यक्रमात असतांना ॲड. दिपक मोटवाणी हे जबरन कब्जा घेण्याकरीता पुन्हा अजय कदम यांच्या घरी गेले व त्यांनी अजय कदम यांच्यासह त्यांची पत्नी, सुन व इतरांना मारहान केली. या प्रकरणी सुध्दा अजय कदम हे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेले मात्र पोलीसांनी त्यांना बसवुन ठेवले कदम यांनी आमदार सुमीत वानखेडे यांच्या सोबत संपर्क साधला त्यांनी पोलीस स्टेशन गाठले व एडवोकेट दीपक मोटवानी यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली मात्र अजून त्यांना अटक करण्यात आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

veer nayak

Google Ad