आर के ज्ञान मंदिरम येथे स्वामी विवेकानंद यांची पुण्यतिथी साजरी

0
48
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

पुलगाव

स्थानिक आर के ज्ञान मंदिरम इंग्लिश मिडीयम स्कुल येथे आधुनिक भारताचे मार्गदर्शक व युग प्रवर्तक स्वामी विवेकानंद यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी विशेष परिपाठाचे आयोजन करण्यात आले होते.

 या कार्यक्रमाची सुरवात स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. उपस्थित सर्वांनी आध्यात्मिक गुरू स्वामी विवेकानंद यांना आदरांजली वाहिली. या प्रसंगी शाळेचे प्राचार्य नितीन श्रीवास, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य नितीन श्रीवास यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन समिती, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

veer nayak

Google Ad