स्वच्छतेचा संदेश देऊन संत गाडगे महाराज जयंती उत्साहात संपन्न

0
154
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे. ……..,…. श्री गुरुदेव संस्कार वर्गाने संत गाडगेबाबा यांची जयंती आगळावेगळा उपक्रम राबवून समाजाला स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. श्री गुरुदेव संस्कार वर्ग वर्ग प्रमुख ग्रामगीता चार्य हनुमंत ठाकरे यांनी विद्यार्थ्यांवर श्रमसंस्कार व्हावे म्हणून गाडगे महाराज जयंती परिसरातील कचरा स्वच्छ करून प्रभात फेरीच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. शाळा मंदिरे निटकरा, स्वच्छ करा स्वच्छ करा गाव आपले, स्वच्छ करा असा संदेश देण्यात आला. संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन स्वच्छता दूत जयश्री गंधे ,नलू व्यवहारे, सिद्धांत तावडे ,उषा भिमती यांच्या हस्ते फोटोचे पूजन करण्यात आले. सोबतच शिक्षक महेश धांदे, हर्षल गावंडे ,अंकुश डुकरे ,मयूर बालपांडे व हनुमंत ठाकरे उपस्थित होते .स्वच्छता प्रभात फेरी यांचे प्राचार्य मोहम्मद उज्जैनवाला यांनी स्वागत करून विद्यार्थ्यांना संत गाडगे महाराज जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. या प्रभात फेरीला स्वच्छता दूत माला निमजे ,माधुरी भोयर, सीमा गावंडे, संगीता धवणे ,कांता उके ,सुवर्णा चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते .

मुलांनी हातामध्ये खराटे व कचराकुंडी घेऊन रस्त्यावर असणारी घाण साप करून कचरा स्वच्छ करून गीताच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश दिला. ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे यांनी संत गाडगे महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना आपल्या भाषणातून ते म्हणाले संत गाडगेबाबा एकही वर्ग शिकलेले नव्हते तरी त्यांचे नाव आज अमरावती जिल्ह्यातील अमरावती विद्यापीठाला आहे. कारण त्यांनी समाजाची सेवा केली सेवा परमो धर्म आपल्या हातून अशीच सेवा घडावी संत गाडगेबाबांची दशसूत्री आहे. त्याप्रमाणे आपले जीवन असावं यासाठी संत गाडगे महाराज यांच्या छोट्या छोट्या बोधकथा सांगून बालमनावर चांगले संस्कार व्हावे यासाठी पशु हत्या करू नये, चोरी करू नये ,आपलं घर स्वच्छ ठेवावे ,झाडे लावावी व अशासारख्या अनेक गोष्टींवर प्रकाश टाकून ते म्हणाले वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी संत गाडगे महाराज शिक्षण महर्षी पंजाबराव देशमुख यांचे जर आपण जीवन चरित्र वाचले तर आपलेही जीवनामध्ये नक्कीच बदल होईल व आपणही समाजातील नवीन सेवाकार्य करू शकू त्यासाठी आपल्याला कोणत्याही कामाची लाज वाटता कामा नये .

 

त्यासाठी आपल्यामध्ये श्रमसंस्कार असणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले .विद्यार्थ्यांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे भजन गुरुदेव हमारा प्यारा सारी दुनिया का तू ही करण धार है /या भजनाने प्रभात फेरीला वेगळा रंग आणला कार्यक्रमाचा शेवट गेले सांगून गाडगेबाबा या गीताने ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे यांनी केला कार्यक्रमाच्या शेवटी जय घोष देण्यात आला. स्वच्छतेचा संदेश देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

veer nayak

Google Ad