स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये समर कॅम्प मोठ्या उत्साहात साजरा

0
38
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे

श्री दत्ताजी मेघे बाल कल्याण शिक्षण संस्था द्वारा संचालित स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये ‘समर ब्लास्ट’ या समर कॅम्पचे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले . या कॅम्पचे आयोजन विद्यार्थ्यांमधील सर्जनशिलता, क्रीडा कौशल्य, संगीत, नृत्य, कलात्मकता, सादरीकरण कौशल्य वृद्धिंगत व्हावे या उद्देशाने करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. समर कॅम्पमध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका के साई नीरजा उपस्थित होत्या तसेच विद्यार्थी त्यांचे पालक सुद्धा उपस्थित होते. सोबतच सर्व शिक्षक गण उपस्थित होते. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी श्री अजय चिंचम्हलातपुरे , क्रीडा विभाग प्रमुख, आदर्श महाविद्यालय, धामणगाव रेल्वे हे प्रामुख्याने उपस्थित होते. वर्ग पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे गीत सादरीकरण केले. वर्ग चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर तबला आणि नृत्य सादरीकरण केले. समर कॅम्प मध्ये विविध खेळाचे, नृत्यांचे, आर्ट अँड क्राफ्ट, चित्रकला तसेच संगीताचे विद्यार्थ्यांना धडे देण्यात आले. तसेच समर कॅम्प मधील सर्व विद्यार्थ्यांना समारोपाच्या दिवशी भेटवस्तू आणि अल्पोपहार देण्यात आला 

सर्व विद्यार्थ्यांनी पंधरा दिवस उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला व या समर कॅम्प चा मनमुराद आनंद लुटला. शाळेच्या मुख्याध्यापिका के साई नीरजा, शाळेचे कला शिक्षक अतुल मांडवकर , संगीत शिक्षक गौरव देवघरे , नृत्य शिक्षक सचिन उईके, क्रीडा शिक्षक नितीन जाधव आणि मुस्कान कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आणि कार्यक्रम यशस्वी केला.

veer nayak

Google Ad