आमदार बळवंत वानखडे हेच खासदारकीच्या उमेदवारीसाठी सक्षम उमेदवार. सुधाकर पाटील भारसाकळे

0
7
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

प्रतिनिधी

अमरावती जिल्हाभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वादळाप्रमाणे निर्माण झाले. अमरावती लोकसभा क्षेत्र मोठ्या प्रमाणावर विस्तारला गेला असून सुमारे अठरा लाख लोकसभेचे मतदार या जिल्ह्यात आहेत विविध पक्षांच्या वतीने उमेदवारी मिळवण्यासाठी अनेकांनी कंबर कसली .यासह दिल्लीवाऱ्या सुध्दा सुरू आहेत. राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी गट ,शिवसेना गट, भाजपा ,व युवा स्वाभिमान आरपीआय गट, वंचित बहुजन आघाडी ,या पक्षांच्या उमेदवारांनी आपली शक्ती प्रदर्शने सुरू केले आहे गेल्या पाच वर्षात अमरावती जिल्ह्यात नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एकही नेता पुढे सरसावतांना दिसला नाही मात्र खासदारकीच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच उमेदवारी मिळवण्यासाठी शक्ती प्रदर्शने, पोस्टरबाजी, बॅनर बाजी नेत्यांवर बिनबुडाचे आरोप प्रत्यारोप करणे सुरू झाले परंतु शेतकरी कर्जाच्या खाईत बुडाला असताना अनेक नैसर्गिक संकटे शेतकऱ्यांवर ओढवली गेली पीक मालाला योग्य भाव सुद्धा मिळाला नाही अशा हलाकीच्या प्रतिकूल परिस्थितीत अमरावती जिल्ह्यातील एकही नेता शेतकरी हितासाठी लढताना अद्यापही दिसला नाही केवळ राजकीय पत व प्रतिष्ठा टिकवण्यासाठी आता फक्त उमेदवार उमेदवारी मागताना दिसत आहेत परंतु दर्यापूर विधानसभा क्षेत्राचे कर्तव्यदक्ष अशी ख्याती असलेले आमदार बळवंत वानखडे यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने जवळपास उमेदवारी निश्चित केली असल्याचे पक्षश्रेष्ठींनी विविध आयोजित कार्यक्रमात घोषित केले आहे या तुलनेत अमरावती लोकसभा उमेदवार अद्यापही घोषित झाला नाही. सर्वसामान्य जनतेशी व मातीशी नाळ जोडलेला असा प्रामाणिक उमेदवार म्हणून बळवंत वानखडे यांना सर्वाधिक पसंती मिळत आहे बळवंत वानखडे यांना विविध समाज बांधवांनी सुद्धा उमेदवारी मिळवण्यासाठी परमेश्वराला साकडे घातले आहे लोकप्रिय ख्याती मिळवलेले अभ्यासू व्यक्तिमत्व सर्वांना आपलं मानणारे मीतभाषी अश्या सु स्वभाच्या उमेदवाराला उमेदवारी मिळू नये यासाठी इतर पक्षांच्या वरिष्ठांनी मोर्चेबांधणी सुद्धा केली आहे.

आमदार बळवंत वानखडे हे अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार या भीतीपोटी इतर लहान घटक पक्षांनी बळवंत वानखडे यांच्या विरोधात विविध अफवा समाजात पेरल्या आहेत हे तितकेच सत्य असे मत काँग्रेसचे दर्यापूर तालुका अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे यांनी व्यक्त केले

veer nayak

Google Ad