अचानक झालेल्या अवकाळी पावसाने आज (ता.१२ एप्रिल) मोताळा तालुक्यात प्रचंड नुकसान झाले. रविकांत तुपकर यांच्या वतीने ॲड.शर्वरी रविकांत तुपकर यांनी तातडीने मोताळा तालुक्यात नुकसानीची पाहणी करून नुकसानग्रस्तांना धीर दिला.
निवडणूकीचा काळ असला तरी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करायला प्राधान्य द्यावे व नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासनस्तरावर प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी रविकांत तुपकरांनी केली आहे.