पर्यटनदिनानिमित्त विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन

0
5
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अमरावती, दि. 27 : जागतिक पर्यटन दिनानिमित्त आज विविध उपक्रम राबविण्यात आले. यात पक्षीनिरिक्षण, कला प्रदर्शन आणि पथनाट्याचे सादरीकरण करून पर्यटनाबाबत जनजागृती करण्यात आली.

जागतिक पर्यटन दिनानिमित्त आज सकाळी छत्री तलाव परिसरात ट्रेकिंग आणि पक्षी निरिक्षणाचा कार्यक्रम पार पडला. यात अॅडव्हेंचर हब क्लबचे जयंत वडतकर, मनिष ढाकुलकर यांनी विविध पक्ष्यांबाबत माहिती दिली. आजच्या पक्षी निरिक्षणामध्ये 35 प्रजातींचे पक्षी आढळून आले. पक्षी निरीक्षकांकडून या पक्ष्यांबाबत सविस्तर वैज्ञानिक माहिती देण्यात आली.

अॅनिमेशन कॉलेजच्या वतीने पेपर शिल्प, कला प्रदर्शनी घेण्यात आली. यात प्रतिभावंत विद्यार्थ्यांनी पेपरपासून तयार केलेल्या गणपतीचे प्रदर्शन भरविण्यात आले. पेपर शिल्पाबाबत प्राचार्य विजय राऊत यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. समाजकार्य महाविद्यालयाच्या युवा पर्यटन क्लबमार्फत इर्विन चौकात पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणातून पर्यटनाबाबत माहिती देण्यात आली. यात सहभागी कलावंताना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्था या आंतरराष्ट्रीय पर्यटन संस्थेद्वारे २७ सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन जाहिर करण्यात आला आहे. या दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय पर्यटन संस्थेद्वारे घोषवाक्य प्रसिद्ध करण्यात आले आहे. यावर्षी जागतिक पर्यटन दिनाचे पर्यटन आणि शांतता हे घोषवाक्य घोषित करण्यात आले होते. त्यानुसार जागतिक पर्यटनदिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. यातून पर्यटन आणि शांततेचा संदेश देण्यात आला आहे.

पर्यटनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात स्थानिक नागरिकांतर्फे विविध क्षेत्रात उपक्रमशिल कार्यक्रम राबविण्यात येतात. ही आशादायक बाब आहे. यातूनही स्थानिक पर्यटनवाढीसाठी हातभार लागेल, असे मत पर्यटन उपसंचालक विजय अवधाने यांनी व्यक्त केले.

veer nayak

Google Ad