उपविभागीय अधिकारी च्या खुर्चीला लावले निवेदनाचे पत्र. कार्यालयात वेळेत अधिकारी गैरहजर,महाविकास आघाडीचे ठिय्या आंदोलन 

0
22
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चांदुर रेल्वे / स्वराज्यासाठी लढलेले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्रातील मालवण येथे उभारण्यात आलेल्या पुतळा काही महिन्यातच पडल्याने या कामात भ्रष्टाचार केलेल्या संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करण्यात यावी, तसेच मागील वर्षापासून शेतकऱ्यांना मंजूर हेक्टरी पाच हजाराची आर्थिक मदत मिळाली नाही ते तातडीने देण्यात यावी, यावर्षी ओल्या दुष्काळाचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई तातडीने देण्यात यावी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, व शेत पंपाचे वीज बिल माफ करा, या व्यतिरिक्त जागतिक जनगणना करण्यात यावी, आदी मागण्याकरिता चांदुर रेल्वे येथे महाविकास आघाडीचे वतीने एक दिवसीय ठिय्या आंदोलन करत यामध्ये भ्रष्टाचार केलेल्या संबंधितं वर कारवाई करण्याकरिता उपविभागीय अधिकारी चांदुर रेल्वे यांना शुक्रवारी निवेदन देण्यात आले, पण यावेळी कार्यालयीन वेळेत येथील उपविभागीय अधिकारी निवेदन घेण्याकरिता हजर नव्हत्या, त्यामुळे महाविकास आघाडी तर्फे संबंधित अधिकारीच्या खुर्चीला निवेदनाची प्रत चिटकवण्यात आली,

 

महाराष्ट्रातील मालवण येथे काही महिने अगोदर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता, पण काही महिन्यातच महाराजांचा पुतळा कोसळला,त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांचे भावनांना ठेच पोचली म्हणून महाविकास आघाडी चांदूर रेल्वेच्या वतीने या कामात भ्रष्टाचार केलेल्या संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच शेतकरी संबंधातील इतर मागण्याकरिता चांदूर रेल्वे येथे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन करण्यात आले व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले, निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष गणेश राय, माजी आमदार वीरेंद्र जगताप, शिवसेना उभाठा गटाचे तालुका अध्यक्ष संजय चौधरी, राजेश पांडे, बंडू यादव गजानन यादव,आम आदमी पार्टीचे जिल्हा संयोजक नितीन गवळी, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अमोल होले शहर अध्यक्ष निवास सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष निलेश सूर्यवंशी, प्रवीण घूईखेड,परीक्षेत जगताप शहजाद सौदागर, गोविंदराव देशमुख,जगदीश आरेकर,प्रभाकर वाघ, सुमेद सरदार, हर्षल वाघ, संदीप शिंदे, सतीश देशमुख, रुपेश पुडके राष्ट्रवादी शरद पवार गटाचे, तालुकाध्यक्ष विनोद काळमेघ,डॉ सतीश देशमुख, पांडुरंग डोंगरे,अतुल मेटे,यावेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते,

veer nayak

Google Ad