विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास जागृत ठेवून पुढे चालावे … चाफले सर

0
23
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

कावली वसाड
प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपला आत्मविश्वास जागृत ठेवून कार्य करावे असे मत आपले सर यांनी व्यक्त केले ते लाभचंद मूलचंद राठी विद्यामंदिर येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना आयोजित निरोप समारंभाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून पत्रकार नितीन टाले तर प्रमुख अतिथी म्हणून अर्चना झाडे,प्रदीप जोगे, मुख्याध्यापक सुधाकर मसराम, चाफले सर,राठोड सर, इंगळे,मॅडम अतुल बाहकर, नीलकंठ भोंगाळे इंदिरा टाले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली.

नववीच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ देतेवेळी अखेरचा निरोप देताना शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सोबतच या शाळेतील ज्या शिक्षकांना गुरुवर्य मानले त्या शिक्षकांना दहावीच्या विद्यार्थ्यांनी काही भेटवस्तू दिल्या.आपलं यश प्राप्त करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी मनामध्ये कशाची भीती न ठेवता आपलं ध्येय पूर्णतः करावी अशी मसराम यांनी यावेळी बोलताना केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन टाले यांनीही आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रदीप जोगी यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. दहावीच्या विद्यार्थ्यांनी पाचवीपासून आम्ही दहावीपर्यंत या शाळेमध्ये शिकत असताना अनेक संस्कार आमच्यावर चांगल्या पद्धतीचे घडले त्या संस्काराची उणीव आम्ही भासू देणार नाही आमचे पुढील कार्यही अशाच पद्धतीने आणि करत राहू असे विद्यार्थ्यांनी आपल्या सुनियोजित भाषणामध्ये केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग नववीच्या विद्यार्थ्यांनी केले तर आभार प्रदर्शन इंदिरा टाले यांनी केले.

या निरोप समारंभाच्या सरते शेवटी अनेक विद्यार्थ्यांना खाऊ म्हणून नाश्ता व चहापाणी करण्यात आले.
या कार्यक्रमाला विद्यार्थ्यासोबत काही गावातील प्रतिष्ठित नागरिक सुद्धा उपस्थित होती. निरोप समारंभाचा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता या शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तथा नववीच्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. शाळा सोडते वेळी विद्यार्थ्यांना दुःखही होत होते आणि आनंदही होत होता हा अनुभव यावेळी दिसून आला

veer nayak

Google Ad