स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये प्लॅनेट परेडचे आयोजन. या आश्चर्यकारक खगोलीय घटनेचा विद्यार्थ्यांनी आनंद लुटला

0
44
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे

श्री दत्ताजी मेघे बाल कल्याण शिक्षण संस्था द्वारा संचालित स्कुल ऑफ स्कॉलर्स मध्ये प्लॅनेट परेड चे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला इयत्ता 8वी ते 10वी पर्यंतचे विद्यार्थी,

त्यांचे पालक व सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाची पहिली तयारी २ जून ला करण्यात आली होती तर ३ जून रोजी सकाळी 5 ते 6:30 या वेळेत सर्व विद्यार्थी आणि पालकांना अद्भूत ग्रहांची परेड पाहण्याची संधी मिळाली. शाळेत दुर्बिण बसवण्यात आली होती,

ज्यामुळे आकाशातील एकाच रेषेतील सर्व ग्रहांच्या संरेखनाचा दुर्मिळ संयोग पाहण्याची संधी मिळाली, विद्यार्थ्यांनी चित्रेही काढली, सर्वांनी त्यात उत्साहाने सहभाग घेतला.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य के.साई नीरजा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

veer nayak

Google Ad