आर्वीतील राष्ट्रवादीच्या शिव स्वराज्य वेष भुषा स्पर्धेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद

0
133
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

वर्धा जिल्हाध्यक्ष शरद शहारे यांची प्रमुख उपस्थिती तर जज कमिटी निर्णयानुसार पहिले पारितोषिक वैष्णवी अढाऊ तडेगाव , दुसरं बक्षीस वैष्णवी मानकर आर्वी ,तिसरं बक्षीस पार्थ डोलकर आर्वी यांना 

आर्वी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांच्या नेतृत्वात काल सायंकाळी शनिवार ला आर्वी येथील जनता नगर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या रोजगार व स्वयं रोजगार व सामाजिक न्याय विभाग कडून वेष भुषा स्पर्धा व विविध कार्यक्रमाच आयोजन केल होत, कार्यक्रमात जज कमिटीत, परणकर इंजिनियरिंग कॉलेज चे प्राचार्य ऍड डॉ रविंद्र परणकर, नागरी बँकेचे अध्यक्ष डॉ विनय देशपांडे, आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश सोळंके, माजी मुख्याध्यापक राजानंद वानखेडे, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असलेले सर्व परिचित देविदासजी साठे अशी निरीक्षक कमेटी होती, यावेळी जेष्ठ नागरिक -सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असलेल्या मान्यवर नागरिकांचा शॉल पुष्प गुच्छ नारळ देऊन सत्कार करण्यात आला,

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वर्धा जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा वर्धा जिल्हाध्यक्ष शरद शहारे यांची प्रमुख उपस्थिती होती, तसेच यावेळी आध्यत्म जोपसणारे,धका धकीच्या व स्वार्थी जगाच्या वर्दळीत माणुसकी जपणारे सामाजिक क्षेत्रात आपल्या दायित्वचा ठसा उमटविलेले दीपकराव शहारे यांचा शॉल श्रीफळ पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला, कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला गुलाब पुष्प हार घालून झाली यावेळी राष्ट्रवादी च्या पदाधिकारी कार्यकर्त्यानी पाहुणे आले असता फटाके व अतिशबाजी करत आनंद व्यक्तकेला, या स्पर्धेत राष्ट्रवादी चा सर्व धर्म समभाव चा संदेश देणार प्रदर्शन लक्ष वेधी होत तर नळा वरील भांडण यांनी लोकांच्या चेहऱ्यावर हसू थांबत नव्हतं, तर छोटया व मोठ्या महिला युवक बालकांनी सुंदर असं प्रदर्शन या कार्यक्रमात केले यात प्रथम बक्षीस 5001 तडेगाव येथील वैष्णवी अढाऊ, द्वितीय बक्षीस 3001 वैष्णवी मानकर, तर तृतीय बक्षीस पार्थ डॉलकर यांना मिळाल तसेच यावेळी राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनात व जिल्ह्यातील सर्व नेत्यांच्या पुढाकारात जिल्हा नियोजन समितीतून 1.50 लक्ष निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हाध्यक्ष शरद शहारे यांचा ढोल ताशाच्या गजरात गुलाब पुष्प हार घालून मान्यवरांचे आभार व्यक्त केले या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी, अशोकराव धानोरकर, दिनकर कोयरे, कमलेश चिंधेकर,पंकज नाकतोडे,अशपाक शेख, रवि वानखडे, रामचंद्र मारबते, अरुण उमरे, दिलीपराव बोरकर,मोहनराव खडसे, जावेद भाई, प्रशांत नाकतोडे, रशीद भाई,रोजगार व स्वयं रोजगार जिल्हाध्यक्ष रेखा वानखडे, सामाजिक न्याय विधानसभा अध्यक्ष अर्चना धवणे, शुभांगी कलोडे, सोनाली जैन, ईशरत जहाँ रशीद शेख,शुभांगी धानोरकर, सोनू चिंधेकर, भारती पोटफोडे, मीना बरवटकर, उज्वला डोफे,योगिता राजुरकर,सपना खोंडे, किरण बरवटकर, ममता गहलोतकर यांनी परिश्रम घेतले

veer nayak

Google Ad