मजुर संस्थेला अधिकृत ३३ टक्के कामे द्या सा बा वी अधीक्षक अभियंता यांच्या कडे मागणी 

0
82
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे 

मजुर सहकारी संस्थांना ३३ टक्के कामे देण्याचा शासनाचा अध्यादेश असताना जिल्ह्यातील मजुर सहकारी संस्थांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ३३ टक्के कामे देण्यात येत नाही ही कामे देण्यात यावी व निविदा प्रक्रिया राबितांना मजूर सहकारी संस्था संघाचे ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात यावे अशी मागणीअशी मागणी जिल्ह्यातील मजुर सहकारी संस्थांनी मंगळवारी अधीक्षक अभियंता रुपा राऊळ गिरासे यांच्याकडे केली आहे

अमरावती जिल्ह्यात मजूर सहकारी संस्था च्या वतीने विविध विभागा कडून शासनाच्या निर्णयाप्रमाणे कामे देण्यात येते मात्र जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शासकीय अध्यादेशाला केराची टोपली दाखविल्या जाते जिल्हा मजूर सहकारी संस्थां संघाचे अध्यक्ष मो तनवीर काजी यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता रुपा राहू गिरासे यांची भेट घेतली निवीदा प्रक्रिया राबविताना जिल्हा मजुर संस्थाचा संघ यांचे ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात यावे अशी मागणी यावेळी केली शासनाच्या निर्णयाप्रमाणे ३३ टक्के कामे मजूर संस्थेला देण्यात येणार येणार असून ना हरकत प्रमाणपत्र विषयी शासनाच्या परिपत्राप्रमाणे निर्णय घेण्यात येणार असल्याचे राऊळ यांनी सांगितले यावेळी उपाध्यक्ष साहेबराव माकोडे, तज्ञ संचालक राजू मुंदडा, व जिल्ह्यातील मजुर संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते

veer nayak

Google Ad