राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्कार जाहीर

0
11
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

सौ. भारती राजेश गुहे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्कार जाहीर झाला

अमरावती प्रतिनिधीः अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या भारतीय जनता पार्टी अमरावती शहरातील साई मंडळाच्या अध्यक्षा यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्कार २०२५ जाहीर झाला असून त्यांचे विविध मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

सौ भारतीताई गुहे हया गेली अनेक वर्षांपासून राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेत अमरावती येथील अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने सौ भारती गुहे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्कार २०२५ ने गौरविण्यात आल्याचे संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा माधुरी सचिन चव्हाण यांनी कळविले आहे. या पुरस्काराबद्दल भारतीताई गुहे यांचे विविध मान्यवर व स्तरातून अभिनंदन होत आहे.

veer nayak

Google Ad